समृद्धी संत प्रजाकसत्ताक दिनी करणार देशाचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 08:04 PM2021-01-25T20:04:04+5:302021-01-25T20:04:18+5:30

जळगाव : दिल्ली येथील राजपथावर २६ जानेवारीला होणाऱ्या संचलनात मूळजी जेठा महाविद्यालयची एन.सी.सी. युनिट ची छात्र सैनिक सिनिअर अंडर ...

Samrudhi Sant will lead the country on Republic Day | समृद्धी संत प्रजाकसत्ताक दिनी करणार देशाचे नेतृत्व

समृद्धी संत प्रजाकसत्ताक दिनी करणार देशाचे नेतृत्व

Next

जळगाव : दिल्ली येथील राजपथावर २६ जानेवारीला होणाऱ्या संचलनात मूळजी जेठा महाविद्यालयची एन.सी.सी. युनिट ची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत ही ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून पद भूषविणार आहे.
यावर्षी एन.सी.सी. महाराष्ट्र डायरेक्टरेट मधून केवळ २६ छात्र सैनिकांची निवड करण्यात आली होती. अमरावती एन.सी.सी. ग्रुपआणि १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन मधून समृद्धी एकमेव छात्र सैनिकाची निवड झाली होती.

समृद्धीच्या या दैदिप्यमान यशामुळे महाविद्यालाच्या इतिहासात आणखीन एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, १८ महाराष्ट्र एन.सी.से. बटालिअन चे समादेशक अधिकारी कर्नल प्रविण धिमन, प्राचार्य प्रो. एन.एन. भारंबे, कला शाखेचे प्रमुख आणि माजी एन.सी.सी. अधिकारी लेफ्ट.डॉ. बी. एन. केसूर यांनी समृद्धीचे विशेष अभिनंदन केले. लेफ्ट.डॉ. योगेश बोरसे, सी.टी.ओ. गोविंद पवार, सी.टी.ओ. ज्योती मोरे, सुभेदार मेजर कोमल सिंग आणि पी.आय. स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Samrudhi Sant will lead the country on Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.