एरंडोल येथे सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 07:11 PM2020-07-09T19:11:25+5:302020-07-09T19:11:31+5:30

जनता कर्फ्यू सुरू : नागरिक आणि व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

Samsum at Erandol | एरंडोल येथे सामसूम

एरंडोल येथे सामसूम

Next

एरंडोल : येथे जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूस पहिल्याच दिवशी गुरुवारी चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली होती. या बैठकीत ९ ते १३ जुलैपर्यंत पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी गुरुवारी मेनरोड, फुले-आंबेडकर व्यापारी संकुल, बसस्थानक परिसर, म्हसावद नाका परिसर, बुधवार दरवाजा परिसर, भाजीपाला बाजार तसेच मुख्य बाजारपेठ आदी सर्वच बंद होते. शहरात रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट होता. सर्वच दुकाने बंद ठेवली होती.
एरंडोल शहर व ग्रामीण परिसरात कोणाच्या रुग्णांच्या संख्येत अधिकाधिक वाढ होत असल्यामुळे संक्रमणाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सदरचा जनता कर्फ्यू नागरिकांनी यशस्वी करावा यासाठी नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी समन्वय साधून योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.
नगरपालिकेतर्फे लाऊड स्पीकरवरून जनतेला कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन गल्लोगल्ली फिरून करण्यात येत होते.
जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष रमेश परदेशी, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, मुख्याधिकारी किरण देशमुख, पोलीस पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील आदी अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
५२ वाहन चालकांकडून दंड वसूल
जनता कर्फ्यूच्या दरम्यान शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. तर लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केला म्हणून ५२ दुचाकीस्वारांवर कलम १४४ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

Web Title: Samsum at Erandol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.