धरणगाव तेली समाज आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:13 AM2021-06-29T04:13:01+5:302021-06-29T04:13:01+5:30
धरणगाव : ओबीसी समाजाला जनसंख्येनुसार आरक्षण मिळावे, यासाठी ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार ...
धरणगाव : ओबीसी समाजाला जनसंख्येनुसार आरक्षण मिळावे, यासाठी ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. तहसीलदार यांच्यातर्फे निवासी नायब तहसीलदार मोहोळ यांनी हे निवेदन स्वीकारले.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय झाला आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळण्यासाठी ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करून, जनसंख्येनुसार आरक्षण मिळावे, अशा प्रकारची मागणी धरणगाव तेली समाजाने निवेदनात केली आहे. ओबीसी समाजावर झालेला अन्याय त्वरित दूर होण्याची गरज असल्याने, केंद्र व राज्य शासनाने त्वरित उचित कार्यवाही करून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. एक महिन्याच्या आत आरक्षणाबाबत हालचाल दिसून न आल्यास तेली समाज तीव्र आंदोलन छेडेल, अशी भावना धरणगाव तालुका प्रांतिक तेली समाजाचे अध्यक्ष रतिलाल चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष नीलेश चौधरी, ज्येष्ठ सल्लागार ॲड.वसंतराव भोलाणे आदींनी व्यक्त केली. यावेळी निवेदन देताना ॲड.ज्येष्ठ सल्लागार वसंतराव भोलाणे, धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष नीलेश चौधरी, सुनील चौधरी, विलास चौधरी, नारायण चौधरी, हेमंत चौधरी, अनिल चौधरी, नितीन चौधरी, आबा महाले, भिका चौधरी, दत्तात्रय चौधरी, व्ही.बी. चौधरी, किरण चौधरी, जनकल्याण संस्थेचे मॅनेजर दीपक चौधरी व समाजाचे अनेक बांधव उपस्थित होते.