विदर्भात वाळू तस्करी करणारा डंपर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 07:12 PM2020-08-29T19:12:16+5:302020-08-29T19:13:22+5:30

विदर्भात वाळू तस्करी करणारा डंपर जप्त करण्यात आले

Sand smuggler dumper seized in Vidarbha | विदर्भात वाळू तस्करी करणारा डंपर जप्त

विदर्भात वाळू तस्करी करणारा डंपर जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देमुक्ताईनगर तहसील पथकाची कारवाईवाळू तस्करी करणारा डंपर आहे मलकापुरातील

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील नायगाव, पिप्रीनांदू व बेलसवाडी परिसरातील तापी नदी पात्रातून थेट विदर्भातील मलकापूर, बुलडाणा, अकोला परिसरात वाळू तस्करी होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केल्यानंतर महसूल विभागाने शुक्रवारी रात्री कारवाई करीत विदर्भात वाळू तस्करी करणारा मलकापूर येथील डंपर जप्त केला आहे.
अंतुर्ली परिसरातील वाळू घाट असलेल्या गावांच्या तापी नदी पत्रात जेसीबी व पोकलॅण्डद्वारे हजारो ब्रास वाळूची तस्करी होत असल्याची वस्तुस्थिती आहे. अगदी बुलडाणा व अकोला जिल्ह्यात रात्री वाहतूक करून वाळू तस्करी केली जात आहे. यामुळे नदीपत्राकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पिकांची प्रचंड नासधूस होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडेही निवेदन देण्यात आले होते. याची तत्काळ दखल घेतली गेली.
शुक्रवारी रात्री साडे नऊला तहसीलदार श्याम वाडकर, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, तलाठी गणेश मराठे, मुंढे व इतर महसूल कर्मचारी तसेच एक पोलीस कॉस्टेबल यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे एमएच-२८-बीबी-७६३७ वाळूने भरलेले डंपर पकडले. त्यास पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. सोमवारी दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
डंपरला ट्रॅकर
वाळू तस्करी करणाºया विदर्भातील या डंपरला वाळू माफियांनी ट्रॅकर बसविले होते. पुरणाड फाट्यावर पकडलेले हे डंपर मुक्ताईनगर प्रवर्तन चौकातून पोलिसात नेण्यास भुसावळ रोडकडे वळताच डंपर बंद पडले. लागलीच कारवाईपासून वाचविण्यासासाठी फोनाफानी सुरू झाली. ट्रॅकरवरून डंपरने रस्ता बदलला हे वाळूमाफियांना लगेच कळले.
अन् महसूल विभागाने टोचन लावले
डंपर शहरातील एसटी डेपोसमोर येताच चालकाने त्याने इंजिन जाम झाल्याचा बहाणा करीत महसूल कर्मचाºयांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांनी डेपोतील कर्मचाºयांच्या मदतीने टोचन लावून एका चारचाकी वाहनांच्या मदतीने डंपर नेण्याचा निर्णय घेतला. टोचनही लावले. परत वाहन पुढे जाईना. शेवटी एसटी डेपोतील हेल्पर यांनी डंपर सुरू केले आणि पोलीस स्टेशनपर्यंत पोहचवून दिले.

Web Title: Sand smuggler dumper seized in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.