वाळू चोरी प्रकरण : शिवसेनेचे नीलेश पाटील यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:59 AM2019-07-10T11:59:10+5:302019-07-10T12:00:06+5:30
मालेगाव पोलिसांची कारवाई
जळगाव : मालेगाव तहसील आवारातून वाळूची वाहने पळवून नेणे व अवैध वाळू वाहतूक प्रकरणात शिवसेनेचे नीलेश पाटील (रा. जळगाव) व रमेश कटारे (रा.नाशिक) यांना मालेगाव छावणी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. दरम्यान, मालेगाव न्यायालयाने दोघांना ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मार्च २०१८ मध्ये महसूलच्या पथकाने वाळू वाहतूक करणारे दहा ते बारा वाहने पकडली होती. नंतर ही वाहने तहसील कार्यालयातूनही पळवून नेण्यात आली होती. या प्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल होता.
उच्च न्यायालयाने अटकपूर्व फेटाळला
नीलेश पाटील व रमेश कटारे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे दोघंजण सोमवारी छावणी पोलिसांकडे शरण आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी दिली. नीलेश पाटील व इतरांनी अमळनेर तालुक्यात वाळूचा ठेका घेतला होता. तेथून नाशिक जिल्ह्यात वाळूची वाहतूक केली जात होती. त्यात बनावट पावत्या आढळून आल्या होत्या.