धरणगाव ‘तहसील’मधून जप्त वाळूचे ट्रॅक्टर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:27 PM2018-10-03T15:27:32+5:302018-10-03T15:29:32+5:30

तहसील कार्यालयात पाच दिवसापूर्वी जप्त केलेले अवैध वाळूचे ट्रॅक्टर संबधित मालकाने पळवून नेल्याने मालकासह चालकाविरूद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला तहसीलदार सी.आर.राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sand tractor seized in Dharangaon tahsil was seized | धरणगाव ‘तहसील’मधून जप्त वाळूचे ट्रॅक्टर पळविले

धरणगाव ‘तहसील’मधून जप्त वाळूचे ट्रॅक्टर पळविले

googlenewsNext
ठळक मुद्देधरणगाव पोलिसांत दोघांविरूद्ध गुन्हाबांभोरीच्या ट्रॅक्टर चालक व मालकाचा आरोपींमध्ये समावेशधरणगाव तहसीलदारांनी दिली पोलिसात फिर्याद

धरणगाव : तहसील कार्यालयात पाच दिवसापूर्वी जप्त केलेले अवैध वाळूचे ट्रॅक्टर संबधित मालकाने पळवून नेल्याने मालकासह चालकाविरूद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला तहसीलदार सी.आर.राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तहसीलदारांनी २७ सप्टेंबर रोजी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्र.एमएच २० एएम ४९९३ हे पकडून दंड वसूलीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते. सदर ट्रॅक्टर पाच दिवस तहसील आवारात कारवाई साठी लावले होते.
मात्र हे ट्रॅक्टर २ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपूर्वी संबधित मालकाने चोरीची वाळूसह दंड न भरता गायब केल्याची बाब उघड झाली. त्यानंतर महसूल पथकाने नेमके ट्रॅक्टर कुणी गायब केले याबाबत चौकशी सुरु केली. त्यावेळी हे ट्रॅक्टर संबधित मालकाने गायब केल्याची बाब समोर आली. त्यानंतर तहसीलदार सी.आर.राजपूत यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला येत फिर्याद दिली. त्यानुसार मालक सुदाम सोनवणे (रा.बांभोरी प्र.चा.ता.धरणगाव) व चालक या दोघांविरुध्द ३ लाख किंमतीचे ट्रॅक्टर, एक लाख किंमतीचे ट्रॉली, तसेच पाच हजार रुपये किंमतीची चोरीची वाळू दंड न भरता चोरुन (पळवून) नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पो.निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जोशी हे करीत आहे. अवैध वाळू वाहतुकदाराची मुजोरी हा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: Sand tractor seized in Dharangaon tahsil was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.