माहिजी येथे वाळू लिलावावरून नायब तहसीलदारांवर प्रश्नांचा भडीमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 08:51 PM2020-01-18T20:51:04+5:302020-01-18T20:52:09+5:30
माहिजी, ता.पाचोरा येथील गिरणा नदीच्या वाळूचा लिलाव करण्यासाठी ग्रामस्थांचा ठराव घेण्यासाठी आलेल्या नायब तहसीलदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
कुरंगी, ता.पाचोरा : येथून जवळच असलेल्या माहिजी, ता.पाचोरा येथील गिरणा नदीच्या वाळूचा लिलाव करण्यासाठी ग्रामस्थांचा ठराव घेण्यासाठी आलेल्या नायब तहसीलदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर वाळू उपशाबाबत ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार करत वाळू ठेका न देण्यासाठी गोंधळात ठराव हरकत घेत सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सूत्रांनुसार, पाचोरा महसूल विभागाचे नायब तहसीलदार अमित भोईटे हे १८ रोजी माहिजी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गट नंबर ८, ९ मध्ये गिरणा नदीच्या पात्रातील वाळू लिलाव होण्यासाठी ग्रामस्थांची ग्रामसभा घेऊन ठराव घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नागरिकांनी गिरणा नदीतून मागील ठेकेदाकडून मोठमोठे खड्डे पडले त्यावर काय कारवाई केली? शासनाने दिलेल्या ठेका हा ठेकेदाराकडून नियमानुसार वाळू वाहतूक न करता सर्व नियमांची पायमल्ली केली जाते त्यावर तुम्ही काय करता? आतापर्यंत आम्हाला मागील ठेक्याचा महसूल मिळाला नाही, आम्ही वाहने पकडतो तर तुम्ही का येत नाही? यासह अनेक प्रश्न उपस्थित करत नायब तहसीलदार अमित भोईटे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यासह गिरणा नदी काठाला लागून सामनेर लासगाव व माहिजी या गावांना पाणीपुरवठा करणाºया विहिरी आहेत, असेही यावेळी सांगितले.
माहिजी ग्रामस्थांनी सर्वांच्या सहमतीने वाळू लिलाव न होऊ देण्याचा ठराव ग्रामसभेत मांडला. ग्रामसभेला शत्रूध्न साळवे, ग्रामसेवक पी.बी.पाटील, कैलास पाटील, शिवाजीराव पाटील, नरेश पाटील, अनिल सोनवणे, पोलीस पाटील राजेंद्र पाटील, विजय पाटील, समाधान पाटील, गजानन बडगुजर, कैलास पवार, युनूस बाबेखा यांच्यासह माहिती ग्रामस्थ उपस्थित होते.
कुरंगी येथे वाळूचा ठराव देण्यास ग्रामस्थांचा ग्रामसभेत विरोध
कुरंगी येथील गिरणा नदीपात्रातील वाळूचा लिलाव करण्याचा ठराव न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला.
पाचोरा महसूल विभागाचे नायब तहसीलदार उमाकांत कडन्नोर, कुरंगी सरपंच सुरेश कोळी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली. त्यात कुरंगी येथील गिरणा पात्रातील गट नंबर ६ , २५ , ४३२ व गावठाण या ठिकाणच्या वाळू लिलाव करण्यासंदर्भांत गावाची ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी ग्रामस्थांनी एकमताने वाळूचा लिलाव होऊ न देण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव मंजूर करून नायब तहसीलदारांकडे सोपविण्यात आला. गिरणा काठावर मोठ्या प्रमाणावर शेतकºयांच्या विहिरी आहेत. त्यावर भाजीपाला फळबागायत व इतर शेती उत्पादनाचा पाण्यामुळे मोठा फायदा होतो. त्यावर शेतकºयांचा उदरनिर्वाह चालतो. वाळू साठा गिरणापात्रात असल्याने त्याचा पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते व त्यामुळे विहिरींना पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. या कारणांमुळे ठराव न देण्यास संमती दर्शवली.
यावेळी ग्रामसेवक अविनाश पाटील, विठ्ठल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रत्नराज साळुंखे, पंढरीनाथ पाटील, नामदेव पाटील, सुदामा पाटील, गुलाब साळुंखे, दादा मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.