साने गुरुजी रचित ‘खानदेश स्तोत्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:34 PM2017-07-27T12:34:58+5:302017-07-27T12:37:17+5:30
अनेकांच्या मुखी वसलेल्या आरत्या आणि स्तोत्रे हे मोठे जीवनधन आहे
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 27 - गुरुजींचे ‘खानदेश स्तोत्र’ ही एक परम मंगल रचना आहे. खानदेश हा गुरुजींचा श्वास होता. ते असे म्हणत की, अखेरच्या क्षणी माङया ओठांवर खानदेश हे नाव असो, वसो. भारतीय साहित्य परंपरेत आरती आणि स्तोत्रे यांचा एक विशेष महिमा आहे. अनेकांच्या मुखी वसलेल्या आरत्या आणि स्तोत्रे हे मोठे जीवनधन आहे. शंकराचार्याच्या भाष्य साहित्यावर लुब्ध होणा:या लोकांना त्यांच्या स्तोत्रांनी जी मोहिनी घातली आहे, ती लोकविलक्षण स्वरूपाची आहे.
ज्याच्या माध्यमातून स्तुती वा स्तवन केले जाते, ती रचना म्हणजे स्तोत्र होय. यज्ञ संस्थेत उद्गात्याकडून गायिल्या जाणा:या मंत्रांना स्तोत्र ही सज्ञा आहे. प्रकाशा येथील ‘शिवमहिमA’ स्तोत्र रचयिते पुष्पदंतेश्वराचे नाव या दृष्टीने विशिष्ट म्हणावे लागेल. ‘रामरक्षा’ हे बुधकौशिक ऋषींनी लिहिलेले स्तोत्र आपल्या परिचयाचे आहे. मराठी भाषेत सुप्रसिद्ध असलेली दोन स्तोत्रे अनुक्रमे रामदास स्वामी रचित ‘भीमरूपी’ आणि देवीदासकृत ‘व्यंकटेश स्तोत्र’ आहेत. या रचनेच्या माध्यमातून भगवंताची आळवणी केली जाते. व्यक्तीच्या उज्ज्वल आणि समृद्ध जीवनाच्या प्रार्थनेसाठी स्तोत्र साहित्याचा उपयोग होतो.
भारतभर असलेली ही स्तोत्र परंपरा ध्यानी घेता, गुरुजींनी देशालाच देव मानून लिहिलेले हे स्तोत्र प्रत्ययकारी स्वरूपाचे आहे. गुरुजींच्या ‘पत्री’ काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत आचार्य स.ज. भागवत लिहितात, ‘देव आणि देश या दोनच वस्तू कवीला प्रिय आहेत. देव भक्तीच्या उमाळ्यातून देशभक्ती प्रकटली आहे. ‘गुरुजींनी देवाप्रमाणेच मातृभूमीला- देशाला देव मानून खानदेश स्तोत्र रचले आहे. डॉ. किसन पाटील यांनी या छोटेखानी पुस्तिकेला लिहिलेली प्रस्तावना अतिशय अभ्यासपूर्ण असून, मुळातून वाचावी अशी आहे. ते या प्रस्तावनेत म्हणतात, ‘‘या पुस्तिकेची रचना एकूण 58 ोकांची आहे. चार ओळींचा एक श्लोक असून, प्रत्येक ओळीत बारा अक्षरे आहेत. मुजंगप्रयात वृत्तात त्यांची रचना केली आहे. छंदबद्ध आणि लयबद्ध रचनेमुळे त्यात गेयता आली आहे.’’ आई, भारतमाता आणि पुढे जगन्माता गुरुजींच्या जीवनाचे परम मंगल ध्येय होते. या मातृत्रयींच्या सेवेतून त्यांनी आपल्या जीवनाचा यज्ञ मांडला होता. या काव्य ग्रंथाच्या प्रस्तावनेत गुरुजी लिहितात, ‘‘तुरुंगात असताना कधी-कधी खानदेशातील बरोबरच्या सत्याग्रही बंधूंना मी खानदेशचा इतिहास सांगत असे. तो ऐकून त्यांचे अंत:करण उचंबळून येई हे पाहून. थोडक्यात, खानदेशचा इतिहास स्तोत्र रूपाने लिहावा, असे मनात आले व हे स्तोत्र लिहिले. यात इतिहास जरा चुकला असेल; परंतु येथे भावना व हृदयाचा ओलावाही दिसून येईल. हे स्तोत्र वाचून खानदेशावर प्रेम करावयास आपण लहान, थोर लागू या व त्याला पुन्हा वैभवावर नेऊ या. तो श्री रामचंद्र आपणा सर्वास देशप्रीती देवो व बंधूभाव देवो.’’
गुरुजींनी कुणाचे गुलाम राहू नका, हा संदेश देत असतानाच ‘मुसलमान-हिंदूत एकी करावी’. भांडणे आणि क्षुद्र मोहांचा त्याग करावा. खानदेशात श्रद्धा, बुद्धी आहे, ऐक्य, चित्तशुद्धी, भाग्यसंवृद्धी आहे तर स्वातंत्र्यलब्धी होईलच. समापनात गुरुजी म्हणतात, ‘सदा वैभवे खानदेश सजावा । यशोगंध त्याचा दिगंतात जावा । सदा शुद्ध स्वातंत्र्य स्वर्गात नांदो । कदा आपदा हीनता ती न बाधो । अहर्निश हे स्तोत्र चित्ती म्हणावे । खरे प्रेम या खानदेशी करावे । झळाळोनी शोभे अहा खानदेश । सदा घालू दे दिव्य स्वातंत्र्य वेश’
गुरुजींनी ‘खानदेश स्तोत्र’ लिहिले. ते आज काहीसे दुर्मीळ आहे. प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी ते पुन: प्रकाशित केले. या स्तोत्राचा हा आरंभ बघा. ‘‘नमो खानदेशा, नमो वंद्य देशा । नमो भव्य देशा, नमो स्तव्य देशा। नमो उज्जवला थोर संपन्न देशा। नमो निर्मळा निस्तुला वैभवेशा।।’’
गुरुजींनी ‘काँग्रेस प्रताप’ नावाचे एक काव्य लिहिले आहे. याची सुरुवात अशी आहे ‘श्री गणेशाय नम: वंदुनि विश्वेश्वर। चराचराचा आधार। बुद्धिदाता थोर। परम कारुणिक ।1। वंदुनि यशोदा माता। वंदुनि सदाशिव पिता। वंदुनि सकळ पावन संता। पुण्यवंत 2।’
गुरुजींच्या छोटेखानी प्रस्तावनेतून त्यांचे उचंबळून आलेले हृदय प्रकट होते. त्यांच्या अंतरीची तळमळ आणि देशप्रीत व्यक्त होते. गुरुजींनी केवळ इतिहास सांगण्यासाठी या स्तोत्राची रचना मुळात केलेली नाही. त्यांना देशभक्तीच्या वृद्धिंगत होण्यात आणि जाज्वल्य देशाभिमान व्यक्त करण्यात अधिक रस होता. गुरुजी लिहितात-
तुझी भूमी प्राचीन ही या जगात इथे संस्कृती जन्मली दिव्यकांत
इथे लाभले वंद्य ते रामपाय तुङो भाग्य हे वर्णवे सांग काय
इथे नांदला तो प्रभू रामचंद्र उनब्देव नावे झरा निर्मिशुद्ध
ऋषीला करी तो प्रभू व्याधिमुक्त सदा खूण ती देखती रे पवित्र..
इथे योगीराणा महान चांगदेव समाधिस्थ झाला तुझा तो सदैव
तुङया सन्निधी थोर ते ज्ञानदेव महाज्ञान संपन्न वागीश भव्य
इथे संत गोविंद झाले सुपूत सखाराम ही जाहले थोर संत
सदानाम तोंडी जनांच्या जयांचे तयाते स्मरावे अम्ही नित्य वाचे..
-प्रा.डॉ. विश्वास पाटील