जामनेरला संगीता पिठोडे, एरंडोलला रजनी सोनवणे

By admin | Published: March 14, 2017 11:22 PM2017-03-14T23:22:19+5:302017-03-14T23:22:19+5:30

पंचायत समिती सभापती निवड : धरणगावात शिवसेनेची हॅट्ट्रिक, भगवा फडकला

Sangeeta Pethode of Jamner, Rajni Sonawane from Erandol | जामनेरला संगीता पिठोडे, एरंडोलला रजनी सोनवणे

जामनेरला संगीता पिठोडे, एरंडोलला रजनी सोनवणे

Next

जामनेर/धरणगाव/एरंडोल : धरणगाव पंचायत समितीत शिवसेनेने
सभापती व उपसभापती निवडीत हॅट्ट्रिक केली, तर एरंडोल येथे शिवसेनेच्या रजनी सोनवणे निवडून आल्या. जामनेर येथे भाजपचे बहुमत असतानाही प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले. यात भाजपच्या संगीता पिठोडे यांची सभापतीपदी निवड झाली. 
जामनेर सभापतीपदी संगीता पिठोडे
जामनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या संगीता पिठोडे, तर उपसभापतीपदी गोपाल नाईक यांची निवड करण्यात आली. सभापती व उपसभापतीपदासाठी प्रत्येकी दोन अर्ज आले होते. या वेळी घेण्यात आलेल्या मतदानात 10 विरुद्ध 4 असे मतदान झाले. सभापतीपदासाठी संगीता पिठोडे व गोपाळ नाईक यांनी भाजपाकडून, तर राष्ट्रवादीकडून अनुक्रमे पूजा योगेश भडांगे व किरण दत्तात्रय सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केले होते. पिठोडे व नाईक यांना प्रत्येकी 10, तर भडांगे व सूर्यवंशी यांना प्रत्येकी 4 मते मिळाली. हात उंचावून मतदान घेण्यात आले. नवनिर्वाचित सभापती पिठोडे या पळासखेडे प्र. न. गणातून, तर उपसभापती नाईक हे देऊळगाव गणातून निवडून आले आहेत. पीठासीन अधिकारी तहसीलदार नामदेव टिकेकर यांनी ही निवड जाहीर केली. या वेळी पंचायत समितीचे सर्व 14 नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.  निवड जाहीर होताच भाजपा कार्यकत्र्यानी फटाके फोडून जल्लोष केला. त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. जि.प. सदस्या विद्या खोडपे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, अॅड. शिवाजी सोनार, नवल पाटील, माजी सभापती आरती लोखंडे, गोविंद अग्रवाल, नितू पाटील, दिलीप खोडपे, विलास पाटील, छगन झाल्टे, श्रीराम महाजन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
धरणगावात सभापतीपदी
मंजूषा पवार
धरणगाव तालुक्यातील सहा गणांपैकी पाच गणांमध्ये शिवसेनेने विजय मिळवून पंचायत समितीत आपले वर्चस्व सिद्ध केले होते. त्या बहुमताच्या जोरावर शिवसेनेने सभापतीपदी बांभोरी प्र.चां.च्या सदस्या मंजूषा सचिन पवार यांना, तर उपसभापतीपदी सोनवद बुद्रूकचे सदस्य प्रेमराज बाजीराव पाटील यांची बिनविरोध निवड करून पंचायत समितीवर शिवसेनेचा ङोंडा फडकावण्याची हॅट्ट्रिक  केली आहे. सभापती-उपसभापती निवडीसाठी येथील पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभा झाली. पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार कैलास कडलग यांनी निवडीची प्रक्रिया राबविली. सभापतीपद नामाप्र महिला असल्याने  शिवसेनेच्या मंजूषा पवार यांचे, तर उपसभापतीपदी प्रेमराज पाटील यांचे एक-एक नामनिर्देशन पत्र आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी सहकार राज्यमंत्री तथा उपनेते गुलाबराव पाटील, नगराध्यक्ष सलीम पटेल, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, संजय पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, शहरप्रमुख राजेंद्र महाजन  यांनी नूतन सभापती-उपसभापतींचा सत्कार केला. या वेळी जि.प. सदस्य गोपाळ चौधरी, पं.स. सदस्या जनाबाई कोळी, भाजपा सदस्या शारदा पाटील, सदस्या सुरेखा पाटील, मुकुंदराव नन्नवरे आदींसह माजी सभापती दीपक सोनवणे, भागवत मोरे यांच्यासह शिवसेनेचे अनिल पाटील, सचिन पवार, माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, पी.पी. पाटील, मोतीलाल पाटील, मोहन महाजन, गोकूळ पाटील, बबलू पाटील, नवल पाटील, नीलेश पाटील, विश्वनाथ पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
एरंडोल सभापतीपदी रजनी सोनवणे
एरंडोल येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या रजनी मोहन सोनवणे यांनी 4 मते मिळवून बाजी मारली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी तथा राष्ट्रवादीच्या निर्मलाबाई लहू मालचे यांना 2 मते मिळाली. दरम्यान, उपसभापतीपदी विवेक जगदीश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभापती व उपसभापती या दोन्ही पदांवर शिवसेनेच्या कार्यकत्र्याची वर्णी लागली आहे. एरंडोल पं.स.वर 4 सदस्य शिवसेना, 1 राष्ट्रवादी व 1 अपक्ष असे पक्षीय बलाबल असून पुन्हा एकदा एरंडोल पं.स.वर भगवा फडकला आहे. माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित पदाधिका:यांनी ग्रामीण भागात विविध विकास योजना राबविण्याचा निर्धार बोलून दाखविला. निवड जाहीर झाल्यानंतर माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिका:यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, दशरथ महाजन, वासुदेव पाटील, जगदीश पाटील, ज्ञानेश्वर आमले, मोहन सोनवणे, दिलीप महाजन, हिंमत खैरनार, देवानंद ठाकूर, किशोर चौधरी, पं.स. सदस्य अनिल रामदास महाजन, शांताबाई महाजन, रजनी सोनवणे, विवेक पाटील, राजेंद्र पाटील आदी मान्यवर, शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
एरंडोल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मलाबाई मालचे यांनी शिवसेनेच्या सभापतीपदाच्या उमेदवार रजनी सोनवणे यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली. अनुसूचित जमातीच्या राखीव प्रभागातून आपण निवडून आलो आहोत व रजनी सोनवणे या खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या. त्यांचा अर्ज अवैध ठरवावा, अशी हरकत घेण्यात आली. रजनी सोनवणे यांनी उपविभागीय अधिका:यांनी दिलेले जात प्रमाणपत्र व वैधता प्रस्तावाची पोच सादर केलेली असल्याने त्यांची उमेदवारी वैध ठरवून मालचे यांची हरकत पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार सुनीता ज:हाड यांनी फेटाळून लावली.

Web Title: Sangeeta Pethode of Jamner, Rajni Sonawane from Erandol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.