साकेगावात सॅनिटायझर फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:13 AM2021-05-30T04:13:57+5:302021-05-30T04:13:57+5:30
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, सुभाष कोळी, ...
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, सुभाष कोळी, सुरेश पाटील, सरपंच पती विष्णू सोनवणे, गावातील पाणीपुरवठा कर्मचारी अशोक कोळी, अनिल सोनवाल ग्रा.पं. सदस्य सचिन सपकाळे, गणेश कोळी, कुंदन कोळी, गजानन पवार, सागर सोनवाल, पप्पू राजपूत, सागर सोनवाल अशोक सोनवणे आदींची उपस्थिती होती.
स्मार्ट व्हिलेज साकेगाव येथे आजूबाजूच्या परिसरातील गोदावरी कॉलेज, फार्मसी कॉलेज, चैतन्य महाविद्यालय, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम कर्मचारी, तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांचा गावात सर्रास वापर असतो. गावात कोरोनासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून गावात जागोजागी हँडवॉश स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. शासनाने दिलेल्या कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन सरपंच ठाकरे यांनी ग्रामस्थांना केले आहे.