ग्राम पंचायत निवडणुकीत प्रथमच सॅनिटायझरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 11:53 AM2021-01-14T11:53:03+5:302021-01-14T11:54:26+5:30

ग्राम पंचायत निवडणुकीत प्रथमच सॅनिटायझरचा वापर होणार आहे.

Sanitizer used for the first time in Gram Panchayat elections | ग्राम पंचायत निवडणुकीत प्रथमच सॅनिटायझरचा वापर

ग्राम पंचायत निवडणुकीत प्रथमच सॅनिटायझरचा वापर

Next



मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच सॅनिटायजरचा वापर होत आहे.
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी थांबलीआहे. यात शुक्रवारी मतदान घेतले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिल्यांदाच निवडणूक कार्यक्रम राबविला जात आहे. अशात दक्षता म्हणून गुरुवारी, १५ रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना साहित्य वाटपात सॅनिटायजर आणि सोबतच मतदान कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार औषधीही देण्यात येत आहे.
महाराष्ट्र्रात ३४ जिल्ह्यातील १४ हजार २३४ ग्रा.प.साठी निवडणूक होत आहे. प्रथमच निवडणूक कार्यक्रमात यंदा मतदान कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची दखल घेतली जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील ७८३ पैकी ७२३ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार, दि. १५ रोजी मतदान होत आहे. यात मुक्ताईनगर तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ५१ पैकी ४ ग्रा.प.निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ४७ ग्रा.प.साठी गुरुवारी मतदान कर्मचाऱ्यांना साहित्य वाटपप्रसंगी मतदान केंद्रनिहाय सॅनिटायजर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयामार्फत औषधी देण्यात येत होती. सॅनिटायजर निवडणूक यंत्रणेने दिले तर औषध वाटपात कर्मचारी डॉ.पल्लवी तळेले कोथळी, आरोग्य सहाय्यक विजय पाटील, आरोग्य सेवक, अनंत गंगतिरे, रमेश ठोंबरे, आरोग्यसेविका जी.एम. थिटे, रजणी खरबळकर या कर्मचाऱ्यांनी तपासणी करून औषधी दिली. यात प्राथमिक औषधोपचाराचा समावेश आहे. निवडणुकीत प्रथमच सॅनिटायजरचा वापर होत आहे.

Web Title: Sanitizer used for the first time in Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.