जामनेर बाजार समिती सभापतीपदी संजय देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 09:41 PM2018-09-21T21:41:12+5:302018-09-21T21:42:59+5:30
बाजार समितीच्या सभापतीपदी पहुर येथील भाजपाचे कार्यकर्ते संजय देवराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जामनेर : बाजार समितीच्या सभापतीपदी पहुर येथील भाजपाचे कार्यकर्ते संजय देवराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जामनेर बाजार समितीत भारतीय जनता पार्टी व माजी खासदार ईश्वरलाल जैन समर्थक गटाचे संपूर्ण बहुमत आहे. धनराज चव्हाण यांच्या कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक एम. आर .शाह होते. संजय देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उप सभापती दीपक चव्हाण यांच्यासह सर्व संचालक मंडळ सह भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, अॅड.शिवाजी सोनार, माजी सभापती तुकाराम निकम, रंगनाथ पाटील, सुरेश पाटील, रामेश्वर पाटील राजधर पांढरे, बाजार समिती सचिव प्रसाद पाटील उपस्थित होते.