पाचोरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजय गोहील अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 06:01 PM2019-01-24T18:01:51+5:302019-01-24T18:02:30+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Sanjay Goyal Apatra, President of Pachora Municipal Council, | पाचोरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजय गोहील अपात्र

पाचोरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजय गोहील अपात्र

Next

पाचोरा, जि. जळगाव : पाचोरा नगरपरिषदेचे शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय नाथालाल गोहील यांना जिल्हाधिकाºयांनी अपात्र घोषीत केल्यामुळे राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.
पाचोरा येथील नगरपरिषदची सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी झाली होती. त्यात अनुसूचित जाती या राखीव संवर्गातून संजय नथालाल गोहील हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र निवडूणक झाल्याच्या तारखेपासून ६ महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र न दिल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी तक्रार पराभूत उमेदवार अजय भास्कर अहिरे यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकाºयांनी चौकशी करून मुदतीत वैधता प्रमाणपत्र दिले नसल्याचे सिध्द झाल्यामुळे गोहिल यांना नगराध्यक्ष पदावरून अपात्र ठरविण्याचा निकाल २३ जानेवारी २०१९ रोजी दिला. या निकालामुळे पाचोरा मतदार संघात खळबळ उडाली असून पुढे येऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसतील, अशी चर्चा पाचोरा मतदार संघात सुरू झाली आहे.
पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे अजय भास्कर अहिरे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले होते व सोबत सदरची जागा ही अनु. जातीसाठी राखीव असल्याने निवडून आल्याच्या ६ महिन्याच्या आत मुदतीत दाखल करावयाचे हमीपत्र लिहून दिले होते. मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर संजय गोहील निवडून आले. गोहील यांनी ६ महिन्याच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अजय अहिरे यांनी जिल्हाधिकाºयांकडे ७ सप्टेंबर २०१८ रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार अजय अहिरे यांच्यावतीने अ‍ॅड . विश्वासराव भोसले व अ‍ॅड. महेश देशमुख (उच्च न्यायालय , औरंगाबाद ) यांनी काम पाहिले.

Web Title: Sanjay Goyal Apatra, President of Pachora Municipal Council,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव