साक्री, नवापूरच्या दरोड्यातील आरोपींना जळगावात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 06:34 PM2017-10-11T18:34:22+5:302017-10-11T18:35:16+5:30

साकी, नवापूर येथे वाहने अडवून दरोडा टाकणाºया टोळीचा जळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून जळगावातील दोन तर धुळ्यातील दोन अशा चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एअरगन, दरोड्याच्या पैशातून विकत घेतलेली महागडी दुचाकी, चोरीचा मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नवाबखान गुलाब खान (रा.मकरा पार्क, जळगाव), महमद मुददसर आलम शेख (रा.हुडको, शिवाजी नगर, जळगाव), जावेद अन्सारी अख्तर हुसेद व अहमद उस्मान अन्सारी (दोन्ही रा.धुळे) अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत.

Sanjri, Navapur's robbery arrested in Jalgaon | साक्री, नवापूरच्या दरोड्यातील आरोपींना जळगावात अटक

साक्री, नवापूरच्या दरोड्यातील आरोपींना जळगावात अटक

Next
ठळक मुद्देजळगाव पोलिसांची कारवाई एअरगन, मोबाईल, दुचाकी जप्तदरोड्यातील मोबाईलमुळे फुटले बींग

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,११: साकी, नवापूर येथे वाहने अडवून दरोडा टाकणाºया टोळीचा जळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून जळगावातील दोन तर धुळ्यातील दोन अशा चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एअरगन, दरोड्याच्या पैशातून विकत घेतलेली महागडी दुचाकी, चोरीचा मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नवाबखान गुलाब खान (रा.मकरा पार्क, जळगाव), महमद मुददसर आलम शेख (रा.हुडको, शिवाजी नगर, जळगाव), जावेद अन्सारी अख्तर हुसेद व अहमद उस्मान अन्सारी (दोन्ही रा.धुळे) अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नवाबखान गुलाब खान (रा.मकरा पार्क, जळगाव) हा कोणताही काम धंदा करीत नसताना त्याच्याकडे महागड्या दुचाकी, अतिशय महागडे बूट व उच्च राहणीमान यामुळे पोलिसांच्या रडारवर आला होता. अशातच साक्री येथील इकबाल मोहम्मद मुस्तफा (रा.धुळे) या साडी व्यापाºयाला १ लाख ९७ हजारात लुटल्याच्या घटनेत जळगावच्या नवाब याचा समावेश असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजयसिंग पाटील व प्रितम पाटील यांचे पथक तयार केले होते.


दरोड्यातील मोबाईलमुळे फुटले बींग
पोलिसांनी नवाब याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेला मोबाईल हा साडी व्यापाºयाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला ‘खाकी’ हिसका दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली देत जळगावचा महंमद शेख व धुळ्यातील जावेद अन्सारी अख्तर हुसेद व अहमद उस्मान अन्सारी यांचे नाव सांगितले. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पथकाने जळगावच्या दोघांना सोबत घेत मंगळवारी धुळे गाठले. एकाला पावणे अकरा वाजता तर दुसºयाला मध्यरात्री दीड वाजता ताब्यात घेवून जळगावात आणले. या चौघांनी नवापूरजवळ ट्रॅव्हल्स बसवर दरोडा टाकून हवाल्याचे २१ लाख रुपये लुटल्याची कबुली दिली. बुधवारी सायंकाळी चौघांना नवापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Sanjri, Navapur's robbery arrested in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.