संकल्प हे सिध्दीचे व्दार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:51 PM2019-09-02T12:51:16+5:302019-09-02T12:52:12+5:30
संकल्पाची शक्ती अपार आहे. जी व्यक्ती प्रबळ आत्मबळी आहे, ती दृढ इच्छाशक्तीने असंभव गोष्टीलाही संभव करू शकते. भगवान महावीरांच्या ...
संकल्पाची शक्ती अपार आहे. जी व्यक्ती प्रबळ आत्मबळी आहे, ती दृढ इच्छाशक्तीने असंभव गोष्टीलाही संभव करू शकते. भगवान महावीरांच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आहेत जो त्यांच्या अजेय शक्तीचे द्योतक आहेत. समस्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतात. पण जो घाबरून त्यांचा सामना करत नाही, तो त्याच्या लक्ष्यला प्राप्त करू शकत नाही. महावीरांना पहिल्या दिवसापासून अशा कठीण प्रसगांना सामोरे जावे लागले. पण ते महाबली होत. प्रत्येकवेळी ते आगीत असलेल्या सोन्याप्रमाणे चमकत राहिले.
जीवनात शिखराला तेच पाहतात, जो प्राणशक्तीच्या आधारे पुढील मंजिल प्राप्त करतात. इंद्रियांची आसक्ती, काम-भोगाची अभिलाषा, छोट्या छोट्या आमिषांमध्ये मुग्ध होणे ही संकल्पसिध्दीतील बाधा आहेत. ज्याची प्राणशक्ती प्रखर होते, ते प्रत्येक बाधाला पार करून उद्दीष्टापर्यंत पोहोचतात. भगवान महावीर, भगवान बुध्द, शंकराचार्य, दयानंद सरस्वती, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी, संत एकनाथ आदींचे जीवनचरित्र दृढ संकल्पाचा एक आलेख म्हणावे लागेल.
-साध्वी श्री निर्वाणश्री जी