खान्देशातील जिनींग उद्योगांवर ‘संक्रात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 09:42 PM2017-11-24T21:42:31+5:302017-11-24T21:49:46+5:30

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकºयांना इतर राज्याच्या तुलनेत कापसासाठी कमी मिळणारा हमीभाव, वाढलेला मार्केटकर व विजेचे वाढलेले दर यामुळे जिनींग उद्योगावर संक्रात आली आहे.

'Sankrut' on the field of congenial jining industries | खान्देशातील जिनींग उद्योगांवर ‘संक्रात’

खान्देशातील जिनींग उद्योगांवर ‘संक्रात’

googlenewsNext
ठळक मुद्दे १५० पैकी ५० कारखाने बंद :५ हजारहून अधिक कामगारांवर उपासमारीची वेळअनेकांनी जिनींग काढल्या विक्रीला

आॅनलाईन लोकमत

अजय पाटील

जळगाव-दि.२४-गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकºयांना इतर राज्याच्या तुलनेत कापसासाठी कमी मिळणारा हमीभाव, वाढलेला मार्केटकर व विजेचे वाढलेले दर यामुळे जिनींग उद्योगावर संक्रात आली आहे. कापसाला भाव मिळत नसल्याने खान्देशातील शेतकºयांचा गुजरातमध्ये कापूस विक्रीचा कल पाहता खान्देशातील १५० जिनींगपैकी यंदा केवळ १०० जिनींग सुरु असून, ५० जिनींग बंद आहेत. यामुळे या जिनींगमध्ये काम करणाºया ५ हजार कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याची माहिती खान्देश जिनींग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदिप जैन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

राज्यात विदर्भ  व खान्देशात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. त्याच दृष्टीने खान्देशात जिनींग उद्योग देखील मोठ्या प्रमाणात असून, १५० जिनींग उद्योग खान्देशात आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून कापसाला परवडणारा हमीभाव निश्चित केला जात नाही. त्यामुळे शेतकºयांचा कापूस विक्रीसाठीचा कल परप्रांतात वाढला आहे. यामुळे खान्देशात कापसाचे उत्पादन अधिक होत असले तरी मात्र जिनींग उद्योग डबघाईला आला आहे.

जिनींग उद्योग डबघाईला येण्याची कारणे
 १. गुजरात किंवा इतर राज्यातील जिनींग व्यावसायिकांना ६ रुपये दराने प्रतियुनीट वीज वापरायला मिळते. मात्र महाराष्टÑात जिनींग उद्योगाला १२ रुपये प्रतियुनीट दराने वीज दिली जाते.
२. राज्यातील शेतकºयांना योग्य  हमीभाव मिळत नाही, तसेच गुजरात सरकारने कापसावर ५०० रुपये बोनस जाहीर केल्याने. शेतकºयांकडून गुजरात किंवा खान्देशातील अनोेंदणीकृत व्यापाºयांना कापूस विक्री केली जात आहे. यामुळे खान्देशातील जिनींगमध्ये पुरेसी आवक होत नाही. तर शासकीय खरेदी केंद्रावर शुकशुकाट पहायला मिळत आहे.
३. जिनींग व्यावसायिकांसाठी शासनाकडून मार्केटकर देखील निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये जिनींग व्यावसायिकांना प्रतीक्ंिवटलला ५० रुपये इतका मार्केट कर दिला जातो. आधीच शासकीय हमीभावापेक्षा जास्त भावाने कापूस खरेदी केल्यावर मार्केटकर देखील व्यावसायिकांना दिला जात असल्याने जिनींग व्यावसायिकांना हा उद्योग परवडत नाही.
४.जिनींग उद्योगासोबतच  प्रेसिंग किंवा ढेप तयार करण्याचे जोड उद्योग केले जातात. मात्र इतर राज्यांच्या तुलनेत खान्देशात या जोड उद्योगांची प्रगती फारसी झालेली नाही.

अनेकांनी जिनींग काढल्या विक्रीला
जिनींग उद्योगावर आलेल्या संक्रातमुळे वर्षभरात अनेक जिनींग व्यवसायिकांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी जिनींग विक्रीला देखील काढाव्या लागल्या आहेत. १५० पैकी १०० जिनींग जरी सध्यस्थितीला सुरु असल्या तरी या ठिकाणी आवक मात्र मंदावली आहे. २५ लाख गाठींची अपेक्षा असताना यंदा १५ ते २० लाख गाठी तयार होण्याची शक्यता असल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

टेक्सटाईल पार्कची केवळ जागा निश्चित
दरम्यान, जिल्ह्यात टेक्सटाईल पार्कचीच घोषणा झाली होती. त्यासाठी जामनेर तालुक्यात जागा निश्चित करण्यात आली आहे. टेक्सटाईल पार्क सुरु झाल्यास खान्देशातील कापूस उत्पादक शेतकºयांना अच्छे दिन येण्याची अपेक्षा आहे.  हे पार्क सुरु झाल्यास डबघाईला आलेल्या जिनींग उद्योगावर फारसा चांगला परिणाम होणार नाही. कारण जिनींग उद्योजक आपल्या जिनींग बंद करून या ठिकाणी आपला व्यवसाय सुरु करण्याची शक्यता फारच कमी आहे.

कोट..
जिनींग उद्योग हा शेती व शेतकºयांशी जुळलेला उद्योग आहे. त्यामुळे शासनाने जिनींग उद्योगाला कृषी उद्योग म्हणून मान्यता द्यावी तसेच जिनींग उद्योगावर असलेले बॅँकेचे व्याजदर कमी केल्यास  किंवा मार्केटकर कमी केल्यास जिनींग उद्योगाला उभारी मिळू शकते.
-प्रदिप जैन, अध्यक्ष, खान्देश जिनींग असोसिएशन

शासनाकडून चांगला हमीभाव मिळत नसल्याने शेतकºयांचा कल गुजरातकडे अधिक वाढला आहे. केवळ एकाच वर्षात जिनींग उद्योग डबघाईला आला नसून गेल्या चार-पाच वर्षात या उद्योगात मंदी आहे. अनेक जिनींग बंद पडल्या आहेत.
-लकी टेलर, जिनींग व्यावसायिक

Web Title: 'Sankrut' on the field of congenial jining industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.