संस्कृत भाषा ही आद्यभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 08:59 PM2020-02-10T20:59:39+5:302020-02-10T20:59:52+5:30

जळगाव : नाना शंकरशेठ अतिशय उत्तम वक्ते व सामाजिक सुधारक होते. संस्कृत भाषा ही आद्यभाषा आहे. ती टिकवण्यासाठी प्रयत्न ...

  The Sanskrit language is the acronym | संस्कृत भाषा ही आद्यभाषा

संस्कृत भाषा ही आद्यभाषा

Next

जळगाव : नाना शंकरशेठ अतिशय उत्तम वक्ते व सामाजिक सुधारक होते. संस्कृत भाषा ही आद्यभाषा आहे. ती टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मुंबई सेन्ट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव द्यावे अशी आमची मागणी आहे, असे प्रतिपादन नाना शंकरशेठ यांचे पणतू आणि मुंबई येथील नाना शंकरशेठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र विनायक शंकरशेठ यांनी केले.

स्वर्णकाळ फौंडेशन आणि संत नरहरी सोनार युवा फाउंडशलन ग्रुपतर्फे नाना शंकरशेठ राष्ट्रीय स्मृती पुरस्कार गौरव सोहळा सोमवारी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र विनायक शंकरशेठ होते. मंचावर धुळे येथील महापौर चंद्रकांत सोनार, आमदार राजूमामा भोळे, चंदुलाल पटेल, अनिल पाटील, जि.प.सदस्य प्रताप पाटील, मुंबई येथील अ‍ॅड़ मनमोहन चोंडकर, सावदा येथील नगरसेविका रेखा वानखेडे, मनपाचे नगरसेवक सुरेश सोनवणे, रंजना वानखेडे, डॉ.भरत वाघ, औरंगाबाद येथील भगवान शहाणे, सिल्लोड येथील शिवदास सराफ, जामनेर येथील दिलीप सराफ, भुसावळ रमेश वानखेडे, धुळे येथील पारस देवपूरकर, पारोळा येथील नगरसेवक नितीन सोनार, केशव भामरे, संजय विसपुते, स्वर्णकाळ फौंडेशन आणि संत नरहरी सोनार युवा फौंडेशन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शामकांत दाभाडे उपस्थित होते. सुरुवातीला दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. त्यानंतर संत नरहरी महाराज व नाना शंकरशेट यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. प्रस्तावनेत शामकांत दाभाडे यांनी कार्यक्रमामागील उद्देश सांगितला. स्मिता बागुल व गणेश कोळी यांनी गणेश वंदना सादर केली. नाना कर्तृत्ववान महापुरुष आहेत. त्यांच्या कायार्चा प्रचार प्रसार झाला पाहिजे, असे मनमोहन चौंडेकर म्हणाले. यावेळी केशव भामरे, रंजना वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रतनकुमार थोरात, राजश्री पगार यांनी केले.

कार्यक्रमासाठी दीपक वडनेरे, जालना येथील अक्षय खर्डेकर पुरस्कार सोहळा समितीचे स्वागताध्यक्ष उदय पातोंडेकर, माजी नगरसेवक लता मोरे, शुभांगी बि?्हाडे, दिनेश सोनी, विजय वानखेडे, रमेश वाघ, दिनेश भामरे, लोटन भामरे, केशव भामरे, निलेश भामरे, महेश देवरे, गणेश भामरे, तुषार सोनार, संजय खैरनार, अमोल दाभाडे, विनोद भामरे, मयूर विभांडिक, राहुल नगरकर, लोटन भामरे, किरण भामरे, रविंद्र जडे आदींनी परिश्रम घेतले.

यांचा झाला गौरव
रामचंद्र येरपुडे (नागपूर) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच नाना शंकरशेठ राष्ट्रीय स्मृती पुरस्कार मोतीलाल वडनेरकर (मुंबई), नंदलाल विसपुते (कल्याण), धनराज विसपुते (पनवेल), प्रभाकर मोरे (मुंबई), पुष्पा सोनार (सुरत), ईश्वर मोरे (जळगाव), स्नेहल पोतदार (डहाणू), मंगला व सुरेश पारख (धुळे), पीनल वानखेडे (पुणे), डॉ.लक्ष्मण सोनार (शहादा), विजय बु?्हाळे (नाशिक), वैशाली विसपुते (जळगाव), शालिनी सोनार (जामनेर), प्रा.डॉ.कृष्णा शहाणे(नाशिक), सुरेखा कपिले (अंधेरी), संतोष पाटील(पाचोरा), चंद्रकांत कोळी (जामनेर), संजय बागुल (अहमदाबाद), मीना सोनार (नाशिक), भावना शिर्सेकर (बांद्रा), गणेश धर्माधिकारी (पुणे), शेख अब्दुल रहीम (औरंगाबाद), प्रशांतराज तायडे(मुक्ताईनगर), अनिल मराठे (शिंदखेडा), फिरोज शेख (जळगाव), नरहरी मटेकर (घाटनांदुरा जि.बीड), नुरुद्दीन मुल्लाजी (कासोदा), स्मिता बागुल (डोंबिवली), अ?ॅड. अनिल ढीलपे (बदनापूर), राजेश पंडित (अंबेजोगाई).

 

Web Title:   The Sanskrit language is the acronym

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.