संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळा प्रस्थान शनिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 02:42 PM2019-06-05T14:42:03+5:302019-06-05T14:45:10+5:30

पंढरीच्या वारीसाठी राज्यातील मानाच्या सात पालखी सोहळ्यापैकी ३१० वर्षाची अखंड परंपरा असलेल्या मुक्ताई समाधी स्थळावरून आषाढी वारीला जाणारी संत मुक्ताबाई पालखी श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर शनिवारी, ८ जून रोजी प्रस्थान करणार आहे. यावर्षी पालखी सोहळा मार्गात व्यसनमुक्तीचा जागर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

Sant Muktabai Ashdhi Vari Palkhi Festival Depart from Saturday | संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळा प्रस्थान शनिवारी

संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळा प्रस्थान शनिवारी

googlenewsNext
ठळक मुद्देव्यसनमुक्तीचा जागर करण्याचा संकल्पमहाराष्ट्रातून शेकडो दिंड्या येतात३३ दिवसांचा ७५० कि.मी. पायी प्रवासवारीत पायी चालताना कायीक, वाचिक व मानसिक तपखान्देश विदर्भासह मध्य प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने असते

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : पंढरीच्या वारीसाठी राज्यातील मानाच्या सात पालखी सोहळ्यापैकी ३१० वर्षाची अखंड परंपरा असलेल्या मुक्ताई समाधी स्थळावरून आषाढी वारीला जाणारी संत मुक्ताबाई पालखी श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर शनिवारी, ८ जून रोजी प्रस्थान करणार आहे. यावर्षी पालखी सोहळा मार्गात व्यसनमुक्तीचा जागर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून शेकडो दिंड्या
या संतोक्तीनुसार वारकरी संप्रदायात परंपरेने चालत आलेल्या आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो दिंड्या पालख्यासह निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाइर्, एकनाथ, नामदेव, तुकाराम हे मानाचे सात पालखी सोहळे त्यांच्या समाधीस्थळावरून जात असतात. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाई पालखी ३१० वर्षे पासून अविरत नेण्याची परंपरा लाभली असून, यावर्षी वैष्णवांच्या मेळ्यासह ८ जून रोजी मुक्ताबाई पालखी प्रस्थान करणार आहे. ३३ दिवसांचा ७५० कि.मी. प्रदीर्घ पायी प्रवास करत १० जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल.
वारीत पायी चालताना कायीक, वाचिक व मानसिक तप होत असल्याने हजारो वारकरी सोहळ्यात सामील होतात. यामध्ये खान्देश विदर्भासह मध्य प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने असतात. जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यातील १८ तालुके व तिनशेवर गावे दिंडी सोहळा मार्गात येतात. या गावात व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी निश्चितच अल्पसा प्रयत्न म्हणून यावर्षी संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर प्रत्येक गावागावात तरूणांचे समुपदेशन करून त्यांना व्यसनापासून परावृत्त होण्याची शपथ देवून माळकरी बनविण्यात येणार आहे. याकामी संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्तीचा जागर राबविण्यात येणार आहे.
सोहळ्याची जय्यत तयारी
नाचणखेडा, जि.बुरहानपूर येथील प्रकाश रामू पाटील यांना रथाकरिता बैलजोडीचा मान सलग सातव्या वर्षी मिळाला असून ६ रोजी विधिवत पूजन करून बैलजोडी संस्थानमध्ये दाखल होईल. सध्या रथाची पॉलीस , पताका बनविणे, पुजेचे साहीत्य आदि सामानाची जुळवाजुळव तयारी जोरात चालू आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने पालखी मार्गात पाण्याचे टँकर शासनाने वाढवून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
यंदाचे आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांची नाव नोंदणी सुरू झाली आहे. तसेच प्रस्थान सोहळ्यात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, व्यवस्थापक उद्धव जुनारे यांनी केले.
 

Web Title: Sant Muktabai Ashdhi Vari Palkhi Festival Depart from Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.