संत मुक्ताबाई अंतर्धान सोहळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 03:27 PM2020-05-10T15:27:43+5:302020-05-10T15:28:41+5:30

श्रीक्षेत्र कोथळी येथील आदिशक्ती मुक्ताबाई आईचा अंतर्धान सोहळ्याला रविवारी प्रारंभ झाला.

Sant Muktabai disappearance ceremony begins | संत मुक्ताबाई अंतर्धान सोहळा सुरू

संत मुक्ताबाई अंतर्धान सोहळा सुरू

Next
ठळक मुद्देकोथळी येथे अंतर्धान समारंभास प्रारंभशासकीय निर्देशाचे पालन

मुक्ताईनगर, जि.जळगाव : खान्देशच्या कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र कोथळी येथील आदिशक्ती मुक्ताबाई आईचा अंतर्धान सोहळ्याला रविवारी प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय निर्देशाचे पालन करीत प्रातिनिधिक स्वरूपात सोहळा सुरू झाला
१० ते १७ मे च्या दरम्यान दरवर्षी मुक्ताई अंतर्धान सोहळा मोठ्या उत्साहाने व दिमाखाने श्रीक्षेत्र कोथळी येथे साजरा केला जातो. पंढरपूर येथून श्री पांडुरंग परमात्मा व संत नामदेव महाराज, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ व कौंडण्यपूर येथून रुख्मिणी माता पादुका पालख्या व ५० वर दिंड्यांसह राज्यभरातील हजारो भाविक वारकरी सहभागी होतात. संत नामदेव महाराज यांच्या विद्यमान वंशज वतीने ह.भ.प. केशवदास नामदास महाराज पंढरपूर यांचे समाधी सोहळ्यवचे गुलालाचे कीर्तन होत असते.पण यावर्षी कोरोना साथीचे संकट असल्याने शेकडो वर्षांपासूनची परंपरा खंडित होऊ नये म्हणून सरकारने दिलेल्या निर्देशानुसार संस्थानतर्फे सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
१० मेपासून संत मुक्ताबाई समाधीसमोर प्रातिनिधिक स्वरूपात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दररोज दुपारी प्रवचन, संध्याकाळी हरिपाठ आदी कार्यक्रम नित्यनियमाने करण्यात येईल. पारायणाचे लाईव्ह प्रसारण फेसबुकवर ‘संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर’ या पेजवर दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत करण्यात येईल. मुख्य अंतर्धान समाधीदिन वैशाख कृष्ण १० दि.१७ मे रोजी सकाळी ११-१ या वेळेत आपण घरातच संत मुक्ताबाई प्रतिमेवर पुष्पवृष्टी व आरती करून साजरा करावा. यावर्षी पंढरपूर त्र्यंबकेश्वर कौंडण्यपूर येथून येणाऱ्या पादुका पालख्या येणार नाही. तसेच कुणीही परिसरातील दिंड्यांनी आपले नियोजित वारी कार्यक्रम रद्द करावे. तसेच बाहेरचे अथवा स्थानिक कुणाही भाविकांनी मंदिरात लॉकडाऊनपर्यंत येवू नये. मंदिर पूर्णपणे बंद केलेले आहे, असे आयोजकांनी सांगितले.
संत मुक्ताबाई अभिषेक व कलशपूजन, गणपती पूजन, ज्ञानेश्वरी ग्रंथपूजन संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रवींंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महापूजा हरिभक्त पारायण उद्धव जुनारे महाराज यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. महोत्सवास सुरूवात झाली. कोरोनामुळे भाविक वारकरी यावर्षी घरीच राहून आॅनलाईन पारायण सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
 

Web Title: Sant Muktabai disappearance ceremony begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.