अमळनेरला 28 पासून संत सखाराम महाराज यात्रोत्सव
By Admin | Published: April 17, 2017 12:33 PM2017-04-17T12:33:21+5:302017-04-17T12:33:21+5:30
शहराचा धार्मिक, ऐतिहासिक वैभव असलेला हा सोहळा आठवडाभर सुरू राहणार आहे.
अमळनेर, दि. 17- श्री संत सद्गुरू सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवाला 28 एप्रिल पासून प्रारंभ होणार आहे. शहराचा धार्मिक, ऐतिहासिक वैभव असलेला हा सोहळा आठवडाभर सुरू राहणार आहे. बोरी नदीच्या पात्रात यात्रा भरणार आहे.
अक्षय्य तृतीयला (28 एप्रिल) सकाळी नऊ वाजता स्तंभरोपण व ध्वजारोहणाने यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. 28 एप्रिल ते 5 मे दरम्यान तुकाराम महाराज गाथा भजन होईल. 5 रोजी सकाळी 7.30 वाजता मोहन महाराज बेलापूरकर यांचे व दिंडीचे शहरात आगमन होईल. मोहिनी एकादशी, अर्थात 6 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता रथाची मिरवणूक निघेल. 9 रोजी सखाराम महाराज पुण्यतिथी, 10 रोजी सकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक सुरू होईल. तर 11 रोजी सकाळी 10 ते 12 या दरम्यान मोहन महाराज बेलापूरकर यांचे काल्याचे कीर्तन व यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. तसेच 6 ते 9 मे दरम्यान सखाराम महाराज समाधीसमोर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री सखाराम महाराज विठ्ठल रूख्मिणी संस्थान, अमळनेरतर्फे करण्यात आले आहे.