सायगाव येथे ‘महाराष्ट्र केसरी’ रौप्यपदक विजेता सोपान माळी यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 04:24 PM2020-01-19T16:24:56+5:302020-01-19T16:26:09+5:30

पुणे येथे झालेल्या महाराष्टÑ केसरी स्पर्धेतील रौप्य पदक विजेता मल्ल तथा खेडी, ता.चाळीसगाव येथील रहिवासी सोपान माळी यांचा सायगाव येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Saopan Mali, the winner of the 'Maharashtra Kesari' silver medal at Saigao | सायगाव येथे ‘महाराष्ट्र केसरी’ रौप्यपदक विजेता सोपान माळी यांचा सत्कार

सायगाव येथे ‘महाराष्ट्र केसरी’ रौप्यपदक विजेता सोपान माळी यांचा सत्कार

Next
ठळक मुद्देट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी केले सत्काराचे आयोजनसोपान माळीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनग्र्रामस्थांनी सोपान माळी यास शासकीय नोकरीत सामावून घेण्याची केली मागणी

सायगाव, जि.चाळीसगाव, जि.जळगाव : पुणे येथे झालेल्या महाराष्टÑ केसरी स्पर्धेतील रौप्य पदक विजेता मल्ल तथा खेडी, ता.चाळीसगाव येथील रहिवासी सोपान माळी यांचा सायगाव येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी या सत्काराचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सोपान माळीला महाराष्ट्र केसरी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे खासदार पाटील यांनी सांगितले.
यावेळी सोपान माळी यांना खासदार पाटील यांनी ५१ हजार रुपये बक्षीस म्हणून मदत केली.
ग्र्रामस्थांनी सोपान माळी शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली.
यावेळी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, उपसरपंच शंकर महाजन, सुरेश सोनवणे, नथ्थू चौधरी, संभाजी पाटील, पंडित माळी, अर्जुन माळी, धर्मा काळ,े युवराज शिंदे, सुपडू माळी, सुनील पाटील, महादू बच्छे, गोकुळ रोकडे, लाल खाँ पठाण, बाळकृष्ण मेखा, सतोबा काळे, राहुल जगताप, भूषण जगताप, गणेश साबळे, सोपान माळींचे वडील बाळू माळी, मार्गदर्शक गव्हरलाल पहिलवान, दिलीप शिरोडे, सुपडू माळी, रघुनाथ माळी, योगेश महाजन, नाना शिदे, शिवाजी रोकडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सायगाव येथील सर्व कुस्तीप्रेमी तरूण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन पं.स.चे माजी सदस्य संभाजी पाटील यांनी केले.

Web Title: Saopan Mali, the winner of the 'Maharashtra Kesari' silver medal at Saigao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.