आदर्श महिला पुरस्काराने सपना श्रीवास्तव सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:18 AM2021-03-09T04:18:39+5:302021-03-09T04:18:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - गेल्या ५ वर्षांपासून भुसावळ व जळगाव रेल्वे स्टेशन येथे केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाच्या ...

Sapna Srivastava honored with Adarsh Mahila Puraskar | आदर्श महिला पुरस्काराने सपना श्रीवास्तव सन्मानित

आदर्श महिला पुरस्काराने सपना श्रीवास्तव सन्मानित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - गेल्या ५ वर्षांपासून भुसावळ व जळगाव रेल्वे स्टेशन येथे केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून पळून आलेल्या, भरकटलेल्या, व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलांना आधार देऊन त्यांना त्यांच्या सुरक्षित ठिकाणी पोहचविण्याचे उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल समतोल प्रकल्पाच्या व्यवस्थापिका सपना श्रीवास्तव यांचा राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

धुळे येथे राज्यस्तरीय महिला परिषदेत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. निसर्गमित्र समितीचे प्रेमकुमार अहिरे, जिल्हाध्यक्ष डी.बी. पाटील, राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय भामरे, उद्योजक दीपक पाटील उपस्थित होते.

२०१२ मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहचविले

समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून आजपर्यंत २०१२ मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले असून त्यामध्ये २५ राज्यांसह २७५ ठिकाणी समतोलचे कार्यकर्ते प्रत्यक्ष जाऊन पोहचले आहेत.

Web Title: Sapna Srivastava honored with Adarsh Mahila Puraskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.