पहूरचे सपोनि शिरसाट यांची मुख्यालयात बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 04:49 PM2019-08-19T16:49:17+5:302019-08-19T16:49:27+5:30

 अवैध धंद्यांची घेतली वरिष्ठांनी दखल

Saponi Shirsat of Paghur transferred to headquarters | पहूरचे सपोनि शिरसाट यांची मुख्यालयात बदली

पहूरचे सपोनि शिरसाट यांची मुख्यालयात बदली

Next


पहूर ता जामनेर :- पहूर हद्दीतील अवैधधंद्यानी डोके वर काढले असून त्या विरुद्ध कारवाई करणाऱ्या पोलीसांची सुरक्षाच धोक्यात आल्याचे रविवारच्या घटनेवरून समोर आले. त्यामुळे साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाट यांची मुख्यालयात तडकाफडकी बदली केल्याचा चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचा आदेश पहूर पोलीस स्टेशनला सोमवारी प्राप्त झाला आहे.
पहूर हद्दीत अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. पोलिसांची कारवाई कागदोपत्री असल्याने या धंद्याना अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे. गावा गावात हातभट्टया सुरू आहेत. याविरुद्ध धडक मोहीम पोलिसांनी राबविली पण सातत्य नसल्याने पुन्हा दारू विक्री सुरू आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कान उघडणीनंतर पोलीसांनी दिखाव्यापुरतीच दारु अड्डयांवर कारवाई केली आहे. दरम्यान काही दिवसातच दोन ते तीन खुनाच्या घटना घडल्या असून वाकडी प्रकरणात पोलिस आजही संशयाच्या भोवºयात आहेत. घरफोड्या नित्याच्याच झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सांगवी गावात शुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली नाही त्यामुळे संतप्त जमावाने एका पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीसस्टेशन मध्ये कॉलर धरली होती. तर एका प्रकरणात पोलीस स्टेशनवर दगडफेकीचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे अवैध धंद्याविरुद्ध निवेदन देणाºया युवकावर झालेला चाकू हल्ला झाला. याच बरोबर वाहतूकीचा बोजवारा उडाला असून वाहतूक पोलीस शोपीस ठरत आहे. एकीकडे पोलिसांची सुरक्षा धोक्यात आल्याने नागरीकांच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न सर्व घटनांवरून समोर आला आहे. याविषयी सर्व सामान्य नागरीकांध्ये संतप्त भावना व्यक्त होत केल्या जात असून सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.त्यामुळे साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाट यांची पोलीस मुख्यात बदली केली असल्याची चर्चा आहे. तर शिरसाट हे गेल्या दोन दिवसांपासून सुटीवर गेले आहेत. घटनेच्या दिवशी त्यांची रजा होती.
जुगाराच्या घटनेत वाढीव कलमे
पेठ गावातील बडा मोहल्ह्यात एलसीबीने कारवाई केल्यानंतर पोलीस कर्मचारी विजय पाटील यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा मोहसीन पूर्ण नाव नाही. यांच्यासह संबंधित पाच जणांविरुद्ध व तलवार प्रकरणी माजी उपसरपं यांचा भाऊ ऐनद्दीन समसोद्दीनयांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व भारतीय हत्यार कायदा, दंगल , शिविगाळ अशी वाढीव कलमे लावण्यात आली आहे. यात इतर काही महिला व पुरूषांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया.....
बडा मोहल्ला येथे घडलेल्या रविवारी च्या घटनेत पाच जणांना अटक करण्यात आली असून तलवार प्रकरणी एका जणाविरूध्द कारवाई करण्यात आली आहे. तलवार पोलिसांनी जप्त केली आहे. संबधिताविरूध्द वाढीव कलमे लावण्यात आली आहे.
-रवींद्र बागुल, प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक, पहूर पोलिस स्टेशन
 

Web Title: Saponi Shirsat of Paghur transferred to headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.