सरस्वती विद्या मंडळ सचिवांना पाच हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:16 AM2021-03-15T04:16:14+5:302021-03-15T04:16:14+5:30
भालोद येथील सामाजिक कार्यकर्ते कुंदन धर्मा तायडे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत संस्था संचलित श्रीमती प. क. कोटेचा महिला ...
भालोद येथील सामाजिक कार्यकर्ते कुंदन धर्मा तायडे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत संस्था संचलित श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यासंदर्भात रीतसर अर्ज करून माहिती मागविली होती; परंतु जनमाहिती अधिकारी यांनी चक्क आम्हास माहिती अधिकार कायदा लागूच नाही, अशी भूमिका घेऊन माहिती देण्याचे नाकारले हाेते. याप्रश्नी कुंदन तायडे यांनी राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल करून दाद मागितली होती. आयोगाने शैक्षणिक संस्था ही माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत असून माहिती देणे बंधनकारक आहे, असे नमूद करून माहिती देण्यात टाळाटाळ केली म्हणून पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.
——
कोट
आपण बाहेरगावी आहोत. याबाबत काहीही माहिती नाही. माहिती घेतल्यानंतरच याप्रश्नी बोलणे योग्य राहील. सध्या या विषयावर बोलणे शक्य नाही.
-संजय सुराणा, सचिव, सरस्वती विद्या प्रसारक मंडळ