भडगाव येथे महिलांना साड्या वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 07:48 PM2019-01-19T19:48:53+5:302019-01-19T19:49:56+5:30
महिला दक्षता समिती व भडगाव पोलीस ठाणे यांच्यातर्फे १२ महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. पोलीस ठाण्यापर्यंत पती-पत्नीतील वाद पोहोचले आणि त्यात तडजोड झाल्यानंतर यशस्वी समजोता झालेल्या या महिला आहेत.
भडगाव, जि.जळगाव : महिला दक्षता समिती व भडगाव पोलीस ठाणे यांच्यातर्फे १२ महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. पोलीस ठाण्यापर्यंत पती-पत्नीतील वाद पोहोचले आणि त्यात तडजोड झाल्यानंतर यशस्वी समजोता झालेल्या या महिला आहेत.
पती-पत्नी हे संसाराचे दोन्ही चाके आहेत. दोघेही सुखी असतील तर संसारही सुखीच राहतो. अन्यथा दोघांमध्ये वादविवाद झाले तर ते कायमचे दुरावतात त्यांनी सामंज्यास्याने राहावे म्हणजे मने दुरावणार नाहीत, असे मत भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी ‘पती-पत्नी सामंजस्य’ या छोटेखानी कार्यक्रमात साडी वाटप करताना केले.
हा कार्यक्रम महिला दक्षता समिती व भडगाव पोलिसांतर्फे १७ रोजी सायंकाळी झाला. या वेळी १२ महिलांना साडी वाटप करण्यात आली.
या वेळी दक्षता समितीच्या सदस्या नगरसेविका योजना पाटील, नगरसेविका सुशीला पाटील, मीना बाग, वासंती देशपांडे, पो.कॉ.लक्ष्मण पाटील, ईश्र्वर पाटील आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसापासून पती-पत्नीमध्ये अंतर्गत कलह सुरू होते. हे वाद पोलिसांपर्यंत यायचे व दोघांचेही नाराजी असायची. यामुळे स्थानिक पातळीवर पोलीस स्टेशन व महिला दक्षता समितीने दोघांचे मनोमिलन करून त्यांना सुखी रहा, असा संदेश देण्यात आला. त्यानंतर सर्व महिलानी आभार मानले.