मुलांना उच्च पदावर पोहचविणाऱ्या सरला एदलाबादकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:43 AM2019-03-08T00:43:56+5:302019-03-08T00:44:17+5:30

पतीचे छत्र हरवल्यानंतर देखील आपल्या दोघा मुलांचा अतिशय योग्य रित्या आणि संस्कारित सांभाळ

Sarla Edlabadkar, who was leading the children to higher education | मुलांना उच्च पदावर पोहचविणाऱ्या सरला एदलाबादकर

मुलांना उच्च पदावर पोहचविणाऱ्या सरला एदलाबादकर

Next

विनायक वाडेकर
मुक्ताईनगर - हैदराबाद सारख्या शहरात स्वत:ची कंपनी असताना देखील कंपनीत झालेली चोरी व बाजारामध्ये आलेली मंदी यामुळे अचानक परिस्थितीत बदल होऊन गरिबीकडे वाढलेल्या व नंतर पतीचे छत्र हरवल्यानंतर देखील आपल्या दोघा मुलांचा अतिशय योग्य रित्या आणि संस्कारित सांभाळ करताना स्वत:चे विश्व निर्माण करणार मुक्ताईनगर शहरातील महिला म्हणजे सरला सुरेश एदलाबादकर या होय.
सरला एदलाबादकर यांना प्रशांत व धनंजय अशी दोन मुले आहेत. हैदराबाद शहरांमध्ये स्वत:ची प्लास्टिक मोल्डिंग ची कंपनी होती .मात्र बाजारात अचानक आलेली मंदी व कंपनीत झालेली चोरी यामुळे घरची परिस्थिती अतिशय बिकट होऊन त्यांना मुक्ताईनगर गाठावे लागले. त्यानंतरच्या काही काळातच पती सुरेश हैदराबाद कर यांचे निधन झाले .त्यानंतर प्रशांत व धनंजय यांना संस्कारक्षम शिक्षण देत प्रशांत हा संगणक अभियंता होऊन आज स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये मलकापूर शाखेत अधिकारी पदावर कार्यरत आहे. तर दुसरा मुलगा धनंजय हा देखील बांधकाम क्षेत्रातील अभियंता म्हणून स्वत:चा खाजगी व्यवसाय चालवत आहे .धनंजय याने मुक्ताईनगर शहरात गरिबांसाठी घरे योजना राबवली असून ती फार प्रचलित झाली आहे.
आईचे आशीर्वाद व आईने दिलेले संस्कार शिक्षण यातूनच आपण घडलो असल्याची कबुली प्रशांत व धनंजय नेहमी देतात.

Web Title: Sarla Edlabadkar, who was leading the children to higher education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव