चावलेल्या कोब्राला घेऊन सर्पमित्राने रुग्णालय गाठले, प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 08:14 AM2021-11-15T08:14:14+5:302021-11-15T08:14:40+5:30
तरीही सुधीरने तो साप पकडून स्वत: दुचाकी चालवत दहा किमी दूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात साडेअकराच्या सुमारास दाखल झाला.
जळगाव : शिरसोली येथे घराशेजारी निघालेल्या कोब्रा जातीच्या सापाला पकडताना जळगाव येथील सर्पमित्राला त्याने दंश केला. मात्र, सर्पमित्राने न घाबरता कोब्राला पकडून स्वत: दुचाकी चालवत रुग्णालयात दाखल झाला. रविवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला. सुधीर जगन्नाथ सपकाळे, असे या सर्पमित्राचे नाव असून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सुधीर सपकाळे हा भाऊबीजनिमित्त शिरसोली येथे गेला होता. रविवारी सकाळी घराशेजारी साप निघाल्याने सुधीर कोब्रा सापाला पकडत असताना त्याच्या उजव्या पायाला कोब्राने दंश केला. तरीही सुधीरने तो साप पकडून स्वत: दुचाकी चालवत दहा किमी दूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात साडेअकराच्या सुमारास दाखल झाला.
प्रकृती गंभीर
सुधीरला कोब्रा सापाचा दंश झाल्याने त्याला चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, रक्ताच्या उलट्या झाल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोब्राचे २० टक्के विष शरीरात गेले असून २४ तासांनंतर सुधीर धोक्याच्या बाहेर येऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.