१५ व १७ फेब्रुवारी रोजी ठरणार ४२ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:18 AM2021-02-09T04:18:27+5:302021-02-09T04:18:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायतनिहाय विशेष सभा घेण्याविषयीचे आदेश तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिले ...

Sarpanch and Deputy Sarpanch of 42 Gram Panchayats will be on 15th and 17th February | १५ व १७ फेब्रुवारी रोजी ठरणार ४२ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच

१५ व १७ फेब्रुवारी रोजी ठरणार ४२ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायतनिहाय विशेष सभा घेण्याविषयीचे आदेश तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिले असून या विशेष सभांमध्ये सरपंच, उपसरपंच ठरणार आहेत. निवडणूक झालेल्या तालुक्यातील सर्व ४२ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची निवड १५ व १७ फेब्रुवारी अशा दोन दिवसात होणार आहे.

एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक घेण्याच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींची १५ जानेवारी रोजी निवडणूक झाली. त्यानंतर सरपंचपद आरक्षण काढण्यात आले होते. त्यानुसार सरपंच निवडीसाठी १० ते १८ फेब्रुवारी दरम्यान सरपंच निवड करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ५ फेब्रुवारी रोजी आदेश दिले होते. यात तालुक्यांच्या ग्रामपंचायतींचा कार्यक्रम तहसीलदारांनी ठरवावा, असेही निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी तहसीलदार नामदेव पाटील यांनी ग्रामपंचायतनिहाय सरपंच, उपसरपंच निवडीविषयी आदेश जारी केले. यात ४२ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवड दिनांक तसेच अध्यासी अधिकारी यांची नियुक्तीविषयी नमूद करण्यात आले आहे.

यासाठी नियुक्त केलेल्या अध्यासी अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या तारखेला त्या-त्या ग्रामपंचायतीची पहिली विशेष सभा घ्यावी व त्यात सरपंच, उपसरपंच निवड करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नियुक्त अध्यासी अधिकाऱ्यांना ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ग्रामपंचायतनिहाय सरपंच, उपसरपंच निवड

दि. १५ फेब्रुवारी - शिरसोली प्र.बो., म्हसावद, आसोदा, आवार, कानळदा, कुसुंबा खु., भादली बु., फुपनगरी, धानवड, भोकर, बोरनार, नांद्रा बु., सावखेडा बु., मोहाडी, रायपूर, जळगाव खु., फुपणी, वडली, वावडदा, शेळगाव-कानसवाडे, मन्यारखेडा, रिधूर, गाढोदा, नांद्रा खु.-खापरखेडा,

दि. १७ फेब्रुवारी - शिरसोली प्र.न., ममुराबाद, तुरखेडा, वडनगरी, उमाळे-देव्हारी, आव्हाणे, कंडारी, कठोरा, लमांजन-वाकडी-कुऱ्हाडदे, पिलखेडा, दापोरा, धानोरा बु.-नागझिरी, चिंचोली, जवखेडे, रामदेववाडी, कडगाव, तरसोद, डिकसाई.

Web Title: Sarpanch and Deputy Sarpanch of 42 Gram Panchayats will be on 15th and 17th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.