सरपंचपदाच्या थेट निवडणुका अयोग्य - अजित पवार यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:36 PM2017-12-29T12:36:25+5:302017-12-29T12:39:10+5:30

जळगाव येथील ग.स. सोसायटीत सत्कार

Sarpanch direct elections are inappropriate - Ajit Pawar's hinges | सरपंचपदाच्या थेट निवडणुका अयोग्य - अजित पवार यांची टिका

सरपंचपदाच्या थेट निवडणुका अयोग्य - अजित पवार यांची टिका

Next
ठळक मुद्दे मुख्यमंत्रीपदाची थेट निवडणूक का नाही?शाळांबाबतच्या धोरणावर टिका

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29- सरपंचपद, नगराध्यक्षपदाची थेट निवडणूका घेणे नुकसानकारक असून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचीच थेट निवडणूक का घेतली जात नाही ? असा सवाल करीत राज्यातील सरकारचे अनेक निर्णय लोकशाहीला घातक ठरत आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केली. 
ग.स. सोसायटीतर्फे बळीरामपेठेतील कार्यालयात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की, सरपंच,  नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकामुळे संस्थेचे कामकाज व्यवस्थित होत नाही. नगराध्यक्ष, सरपंच एका गटाचा तर सदस्य, नगरसेवक दुस:या गटाचे निवडून आल्यास कामात अडथळे निर्माण होतात.  
पंतप्रधान, मुख्यमंत्रीपदाची निवड जनतेतून का केली जात नाही असा सवालही आपण सरकारला विचारला परंतु  शासनाने काहीच उत्तर दिले नाही. तर सहकाराकडे  पाहण्याचा दृष्टीकोन या सरकारचा चांगला नाही. ते भेदभाव पध्दतीने वागणूक  देत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 
शाळांबाबतच्या धोरणावर टिका
शाळांचे संस्थाचालक म्हणजे दरोडेखोर आणि शिक्षक म्हणजे चोर असा शासनाचा बघण्याचा दृष्टीकोन झाला आहे. त्यामुळेच 1400 शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे गरीब विद्याथ्र्यांचे नुकसान होणार आहे, असे सांगून  शाळा कापोर्रेट कंपन्यांना चालविण्यास देण्याच्या निर्णयावरही पवार यांनी टिका केली. कापोर्रेट कंपन्यांनी उदयोगधंदे  करावे मात्र शाळा चालवू नयेत, यामुळे  गरीब मुले शिक्षणापाूसन वंचित राहतील याचा शासनाने विचार करावा असेही पवार म्हणाले. 
यावेळी संस्थेतील सहकार गटाचे प्रमुख बी.बी.पाटील, चेअरमन विलास नेरकर, व्हाईस चेअरमन कैलासनाथ चव्हाण, माजी मंत्री गुलाबराव         देवकर, जिल्हा बॅंकेचे संचालक अॅड.रविंद्र पाटील, संजय पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, अजित पवार यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या निवासस्थानी भेट देत पदाधिकारी व कार्यकत्र्याशी चर्चा केली. 

Web Title: Sarpanch direct elections are inappropriate - Ajit Pawar's hinges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.