लोण आणि गाळणचे सरपंच अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:16 AM2021-02-10T04:16:59+5:302021-02-10T04:16:59+5:30
जळगाव : लोण प्र.उ.ता.भडगाव आणि गाळण ता.पाचोरा येथील सरपंचांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अपात्र ठरवले आहे. लोण येथील सरपंचांनी ...
जळगाव : लोण प्र.उ.ता.भडगाव आणि गाळण ता.पाचोरा येथील सरपंचांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अपात्र ठरवले आहे. लोण येथील सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याने तर गाळण येथील सरपंचांनी एक वर्षाच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
लोण प्र.ऊ. ता.भडगाव येथील सरपंच संगीता बापु पाटील आणि बापु नागु पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या जागेत ५४० स्क्वेअर फुटात पक्के बांधकाम केले. त्यामुळे त्याची तक्रार गिता भाऊसाहेब पाटील यांनी केली होती. त्यावर ३ जानेवारी रोजी याची सुनावणी संपली होती. मात्र त्याचा निकाल जिल्हाधिकारी राऊत यांनी मंगळवारी दिला.
गाळण खु.पाचोरा येथील विलास उत्तम पाटील यांनी सरपंच सोनाली हिरामण पवार यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यात सोनाली पवार या अनुसुचित जाती महिला गटातून निवडून आल्या होत्या. मात्र त्यांनी या प्रकरणात आपले जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.