गावातील इयत्ता दहावीत प्रथम येणारा विद्यार्थी झाला एकदिवसाचा सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 04:17 PM2018-08-22T16:17:19+5:302018-08-22T16:17:46+5:30

तोरनाळा येथील सरपंच व ग्रा. पं. सदस्यांंचा स्तुत्य उपक्रम

The sarpanch of the village one in the tenth grade, becomes the first one | गावातील इयत्ता दहावीत प्रथम येणारा विद्यार्थी झाला एकदिवसाचा सरपंच

गावातील इयत्ता दहावीत प्रथम येणारा विद्यार्थी झाला एकदिवसाचा सरपंच

Next


वाकोद, ता.जामनेर, जि.जळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकरिता पालक प्रयत्नशील असतातच. शासनही शैक्षणिक उच्चांक वाढावा याकरीता अनेक योजना राबवते. अशाच प्रकारे आपल्या गावातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी येथून जवळच असलेल्या तोरनाळा, ता.जामनेर येथील ग्रामस्थांनी गावी असलेल्या का. आ. विद्यालयामधील इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक आलेल्या गणेश समाधान बोरडे या विद्यार्थ्यास एक दिवसाचा सरपंच पदाचा बहुमान दिला.
गावातील सरपंच व ग्रा . पं.सदस्य यांच्या विचारातून हा उपक्रम राबवून गावातील शाळेतून दरवर्षी इयत्ता दहावीत जो विद्यार्थी प्रथम येईल त्यास १५ आॅगस्ट नंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी एक दिवसाचा सरपंच म्हणून बहुमान देण्यात येईल असे ठरले .
यावर्षी गणेश समाधान बोरडे ह्या विद्यार्थ्यास इयत्ता दहावीत गावातून प्रथम आल्याने दि. २१ रोजी एक दिवसाचा सरपंच होण्याचा बहुमान मिळाला. त्याबद्दल सरपंच युवराज पाटील, उपसरपंच जितेंद्र पाटील व ग्रा. पं. सदस्य यांनी एक दिवसीय सरपंचाचे अभिनंदन केले. तसेच ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ज्येष्ठ संचालक बाबूराव आनंदा पाटील यांनी पुष्पहार घालून सत्कार केला व शाळेच्या वतीने आर. एल. राजपूत, वारखेडे, एम. के. पाटील, जी. ई. पाटील यांनीदेखील अभिनंदन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
अन्य ग्राम पंचायतींनीही घ्यावा आदर्श
विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर केलेल्या या ग्रापंचायतीच्या स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतनेही असा स्तुत्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना उपकृत करावे. तसेच तोरनाळा या ग्रा. पं.न्े केलेल्या उपक्रम विद्यार्थ्यांना नवीन आशा देणारा असून शिक्षणाला गोडी लावणारा असा उपक्रम राबविला आहे. या उद्देशाने विद्यार्थी प्रोसाहीत होऊन गुणवंता वाढीलादेखील मदत होईल.

Web Title: The sarpanch of the village one in the tenth grade, becomes the first one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.