प्रेरणा बोरसे यांना सरपंच आॅफ इयर पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 04:37 PM2019-02-23T16:37:12+5:302019-02-23T17:03:48+5:30

लोकमत सरपंच अवॉर्ड

Sarpanch of the Year Award for inspiration Borse | प्रेरणा बोरसे यांना सरपंच आॅफ इयर पुरस्कार

प्रेरणा बोरसे यांना सरपंच आॅफ इयर पुरस्कार

Next
ठळक मुद्दे१३ विविध पुरस्कार, उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक


जळगाव: संपूर्ण राज्य आणि जिल्हाभरात उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ चे शनिवारी २३ फेब्रुवारी रोजी शहरातील रिंगरोडवरील यशोदया हॉलमध्ये दुपारी थाटात वितरण झाले. याप्रसंगी यंदाचा सरपंच आॅफ इयर हा पुरस्कार अमळनेर तालुक्यातील नगाव खुर्द येथील सरपंच प्रेरणा सुशीलकुमार बोरसे यांना प्रदान करण्यात आला. ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाड्याचा कारभार करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण १३ सरपंचांना ‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले.
बीकेटी टायर्स हे मुख्य प्रायोजक व पतंजली आयुर्वेद हे सहप्रायोजक असलेला हा भव्य सोहळा सुमारे तीन तास चालला. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. बी.एन.पाटील तसेच महाराष्टÑ बीकेटी अ‍ॅग्री सेलचे जुबेर शेख, बीकेटी डिस्ट्रीब्युटर राहूल धूत व हर्षल विभांडीक हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक करताना मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, ग्रामीण भागातील चांगले काम करणाºया सरपंचांची कामे लोकांसमोर यावीत व त्यांच्या कामांचे कौतुक व्हावे, या हेतूने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सदर पुरस्कार उपक्रम गेल्या वर्षापासून सुरु करण्यात आला असून या उपक्रमामुळे गा्रमीण भागातील विकासकामे करणाºयांना प्रोत्साहन मिळत आहे. तसेच इतरांनाही चांगली प्रेरणा देणार हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
गावात जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन - लोकसहभाग, रोजगार व कृषी या ११ कॅटेगरीत सरपंचांनी केलेल्या कामांची पाहणी करुन या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आला. याशिवाय उदयोन्मुख नेतृत्व आणि सरपंच आॅफ द ईयर हे दोन विशेष पुरस्कारही देण्यात आले.
विजेते सरपंच याप्रमाणे
सरपंच आॅफ इयर- प्रेरणा सुशीलकुमार बोरसे (नगाव खुर्द, ता.अमळनेर), उदयोन्मुख नेतृत्व -भारती नितीन चौधरी (न्हावी, ता. यावल), कृषी तंत्रज्ञान- नीता रामेश्वर पाटील (पहूर पेठ, ता.जामनेर), रोजगार निर्मिती-समिता रुपेश गांधी (हरणखेड, ता. बोदवड), प्रशासन व ई प्रशासन आणि लोकसहभाग- शशिकला शेषराव घाटे (उचंदे, ता. मुक्ताईनगर), पर्यावरण संवर्धन- योगिता प्रतापराव सोनवणे (शिरागड/ पथराळे, ता. यावल), ग्रामरक्षण- विकास गणपत पाटील (नशिराबाद ता. जळगाव), पायाभूत सुविधा- स्वाती आत्माराम परदेशी (कोचूर खुर्द ता. रावेर), आरोग्य- माधुरी महेंद्र पाटील (खडकेसीम ता. एरंडोल), स्वच्छता- सुरेश अर्जून पाटील (सुंदरपट्टी, ता. अमळनेर), शैक्षणिक सुविधा- सुषमा विजेंद्र पाटील (कोदोली ता. जामनेर), वीज व्यवस्थापन- रंजना प्रवीण पाटील (लोहारी बुद्रुक, ता. पाचोरा), जल व्यवस्थापन- किरण साहेबराव पाटील (फरकांडे, ता. एरंडोल)

Web Title: Sarpanch of the Year Award for inspiration Borse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.