सरपंचाच्या मुलाने पेट्रोलचे पैसे न दिल्याने असोदा येथे दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:15 PM2019-06-16T23:15:57+5:302019-06-16T23:19:25+5:30
सरपंचाच्या मुलाने ५० रुपयाचे पेट्रोल भरल्यानंतर पैसे न दिल्याच्या कारणावरुन असोदा, ता.जळगाव येथे शनिवारी दोन गटात दंगल प्रकरणी पोलिसांनी स्वत: फि र्यादी होऊन दोन्ही गटाच्या ४५ जणांविरुध्द दंगल व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गावात रात्रभर धरपकड मोहिम राबवून १७ जणांना अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
जळगाव : सरपंचाच्या मुलाने ५० रुपयाचे पेट्रोल भरल्यानंतर पैसे न दिल्याच्या कारणावरुन असोदा, ता.जळगाव येथे शनिवारी दोन गटात दंगल प्रकरणी पोलिसांनी स्वत: फि र्यादी होऊन दोन्ही गटाच्या ४५ जणांविरुध्द दंगल व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गावात रात्रभर धरपकड मोहिम राबवून १७ जणांना अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच नबाबाई दौलत बि-हाडे यांचा मुलगा संजय रविवारी रात्री असोदा गावातील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरायला गेला होता. तेथे ५० रुपयाचे पेट्रोल भरल्यानंतर त्याने पैसे दिले नाहीत. त्यावरुन पंपावर काम करणारा अमोल गोपाळ कोळी यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यावसन गावात दोन गटात हाणामारी व दगडफेकीत झाले. यात पवन सोनवणे व राहूल सोनवणे हे जखमी झाले. गावात तणाव निर्माण झाल्याने रात्रभर शोध मोहिम राबवून १७ जणांना अटक करण्यात आली.
यांना केली अटक
राजेंद्र शालीक कोळी, किरण रामा कोळी, जितेंद्र निंबा कोळी, रवींद्र गलु कोळी, राजेंद्र भावराव बि-हाडे, पवन अरुण सोनवणे, गुणवंत शालीक कोळी, प्रदीप रमेश कोळी, रतन ओंकार भालेराव, विनोद दौलत बि-हाडे, धनराज श्रीराम बि-हाडे, संदीप रामा कोळी, दीपक बाबुराव खंडाळे, संजय दौलत बि-हाडे, मनोज विजय बि-हाडे, छोटू खंडू पाटील व राजू मांगो सोनवणे यांना अटक झाली आहे. राहूल दिलीप सोनवणे हा जिल्हा रुग्णालयात दाखल आहे.
हे आहेत फरार
शक्ती बि-हाडे, अजय राजू सोनवणे, रवी ज्ञानेश्वर सूर्यवंशी, विनोद बापू बि-हाडे, राजेंद्र बापू बि-हाडे, मिठ्या शिवा बि-हाडे, किरण विजय बि-हाडे, मिलिंद दौलत बि-हाडे, सतीश भालेराव, धनराज भालेराव, अमोल कोळी, मनोज हरी कोळी, दिनेश हरी कोळी, भैय्या शालिक कोळी, भोला कोळी, समाधान मुलचंद कोळी, पिंटू गुजर, योगेश राजू कोळी, आप्पा कोळी,दीपक महारु कोळी, गोकुळ कोळी, बबलु कोळी, योगेश कोळी, देवकाबाई राजू,मालुबाई कोळी,आशा अरुण सोनवणे.
अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, तालुका पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक गणेश चव्हाण,उपनिरीक्षक कदीर तडवी,अरुण सोनार, साहेबराव पाटील, विजय पाटील,धर्मेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, ईश्वर लोखंडे व नितीन पाटील यांनी शोधमोहिम राबविली.