शिक्षक होता आल्याने जन्म लागला सार्थकी : डॉ.विजया वाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 03:22 PM2020-06-17T15:22:19+5:302020-06-17T15:24:12+5:30

आज माझे विद्यार्थी मराठी माध्यमात शिकूनदेखील जगात इतकी प्रगती करू शकले याचा अभिमान वाटतो.

Sarthaki was born as a teacher: Dr. Vijaya Wad | शिक्षक होता आल्याने जन्म लागला सार्थकी : डॉ.विजया वाड

शिक्षक होता आल्याने जन्म लागला सार्थकी : डॉ.विजया वाड

googlenewsNext
ठळक मुद्देबाल साहित्याबरोबरच स्वानुभव कथनाने श्रोते झाले तृप्तआॅनलाईन संवाद सत्र : दुसऱ्या टप्प्यातील तिसरे सत्र

भुसावळ, जि.जळगाव : प्रत्येक मूल आपले प्रगतीपुस्तक आनंदाने घरी घेऊन जाईल; त्यासाठी शेवटच्या मुलापर्यंत शिक्षण देणे हेच ध्येय आयुष्यभर ठेवले. आज माझे विद्यार्थी मराठी माध्यमात शिकूनदेखील जगात इतकी प्रगती करू शकले याचा अभिमान वाटतो. शिक्षक होता आल्याने जन्म सार्थकी लागला, असे मत दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील ‘बालसाहित्यिका : गिरिजा कीर’ या पाठाच्या लेखिका डॉ.विजया वाड यांनी मांडले.
जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू असलेल्या आॅनलाईन संवाद सत्राच्या दुसºया टप्प्यातील तिसºया सत्रात डॉ.वाड बोलत होत्या.
प्रास्ताविक, सूत्रसंचालन व नियोजन मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी केले. शैलेंद्र महाजन यांनी डॉ.वाड यांचा परिचय करून दिला. बलवाडी, ता.रावेर येथील विद्यार्थिनी तेजस्विनी चौधरी हिने आभार मानले.
डॉ. वाड आपल्या मनोगतात म्हणाल्या की, मुले शिक्षकांवर मनापासून अकृत्रिम प्रेम करतात. जीवनाचे नवे नवे धडे मुले शिकवतात. मी स्वत: अकरावीपर्यंत मराठी माध्यमात शिकले असून आठवीत इंग्रजीला बाळासाहेबांच्या कृपेने सुरूवात झाली होती. तरीसुद्धा भाषा शिकता येत असल्याने आज चौदा देशात अस्खलित इंग्रजी व्याख्याने दिली. मराठी माध्यमाची मुले कुठेही कमी पडत नाहीत, याचा खूप खूप अभिमान वाटतो. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची बीजे शिक्षकांनीच पेरायची असतात. कुठे जन्म घेतला याला महत्त्व नाही तर तुम्ही तुमच्या पराक्रमाने मोठे होणार आहात, हे विद्यार्थ्यांना ठासून सांगायला हवे. मी खूप बालसाहित्य लिहिले, विश्वकोशाचेदेखील काम केले, त्यातूनही आनंद मिळाला.
बालसाहित्यिका गिरिजा कीर आवडत्या लेखिका असल्याचे डॉ. वाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले. तब्बल तासभर डॉ. वाड यांनी आपल्या लेखन व अनुभवाचा प्रवास आपल्या अमोघ वाणीतून मांडला. त्यामुळे कान तृप्त झाल्याच्या प्रतिक्रिया श्रोत्यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Sarthaki was born as a teacher: Dr. Vijaya Wad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.