‘समाजस्वास्थ्य’ एक नाटय़ानुभव

By admin | Published: May 9, 2017 01:33 PM2017-05-09T13:33:15+5:302017-05-09T13:33:15+5:30

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशल या सदरात सांस्कृतिक या विषयावर नयना पाटकर यांनी केलेले लिखाण

'Sastha Swasthya' is a playwright | ‘समाजस्वास्थ्य’ एक नाटय़ानुभव

‘समाजस्वास्थ्य’ एक नाटय़ानुभव

Next

 ध्यासपर्व चित्रपटाने र. धों. कव्रे यांचे कार्य समाजासमोर पोहोचवलेलं होतं. तरीही केवळ समाज प्रबोधनाच्या हेतूने अशा प्रकारचं कार्य आणि त्या कार्यकत्र्याची परवड समाजापुढे आणण्याची गरज आजही आहे, हे नाटक पाहून समजते.

लैंगिक विषयाला निषिब्ध मानणा:या समाजाला लैंगिक समस्या, कुटुंब नियोजन यासारखे विषय उघडउघड बोलणे, ‘समाजस्वास्थ्य’सारख्या पुस्तिकेतून लिहिले जाणे, हे स्वातंत्र्यपूर्व काळात रुचणारे नव्हतेच. स्वत:कडील सर्व पैसा व एखाद्या उदार अंत:करणाच्या व्यक्तीच्या मदतीतून ही पुस्तिका कव्रे आणि त्यांच्या प}ी चालवत होते. त्यांच्या या निरपेक्ष अथक प्रय}ानंतर, काही पीडित, गरजू स्त्री-पुरुष त्यांच्याकडे मदत घेण्यासाठी येऊ लागले. काही पत्रोत्तराद्वारे शंका समाधान करून घेऊ लागले. मानवी जीवन अस्वस्थ करणारे विषय अगदी मोकळेपणाने विचारले जाऊ लागले. अर्थात रुढी परंपरांना अंधश्रद्धेने कवटाळणारे समाजकंटक टपलेलेच होते. रधोंच्या कार्याचा अपमान, अवहेलना व टीका करून त्यांच्या विरोधात समाजाला भडकावणे. त्याही पुढे जाऊन गुन्हेगाराप्रमाणे कोर्टात त्यांच्यावर ईलपणाचा आरोप करून त्यांची पुस्तिका बंद पाडण्याचा उपद्व्यापही केला. त्यांचे विचार पटत असूनसुद्धा अंधश्रद्धांची पट्टी समाजाच्या डोळ्यांवर घट्ट बांधून ठेवण्यासाठीच एक शक्ती काम करीत असते.
 आपल्याकडे असे विचारांचे दोन प्रवाह सातत्याने वाहत आले आहेत. रुढी परंपरा, चालीरीतींना अंधश्रद्धेने पाळणारा एक प्रवाह आणि काळानुसार विचार वर्तनात बदल घडवून आणू पाहणारा दुसरा प्रवाह.
 आज इंटरनेटच्या माध्यमातून मुलांना अद्ययावत माहिती मिळते आहे. अशावेळी पालकांनी मुलांवर निव्वळ नियंत्रण ठेवण्याचं धोरण अनुसरून चालणार नाही. मुलांच्या शंका, भीती, गैरसमज, कुतूहल, अंधश्रद्धा, नैराश्य, मनातील भावनिक गोंधळ यांचं समाधान निराकारण व्हायला नको का? या विषयांवर बोलायला कित्येक पालक आजही कचरतात. लैंगिक विषय तरी निषिद्धच मानतात, तर मग मुलांनी या विषयाचा सामना करायचा कसा? निचरा तरी होणार कसा या विचारांचा?
मुलींचे घाईने लग्न लावून देणे किंवा तिला सख्त बंधनात ठेवणे, कठोर शासन करणे म्हणजे रुढींना पाळल्याचे प्रमाणपत्र असते. त्यात कुटुंबामागे मुलांना न्याय वेगळा अन् मुलींना न्याय वेगळा, ही सरसकट परंपरा! मुलाच्या वागणुकीवर पांघरूण घातलं जातं, दडपलं जातं. मात्र मुलींना जाब विचारून कठोर शासन केलं जातं. गंभीर चुकीसाठी तरी आत्महत्या करेर्पयत अवहेलना निश्चित! मुलांना त्यांच्या समस्या मोकळेपणाने सांगण्याची, विचारविनिमयाची. त्यांना प्रेमाने सांभाळून घेणारी परंपरा केव्हा तयार होणार आहे?
आंतरजातीय विवाहाने जात, वंश बाटेल या भीतीपोटी मुलींना शिक्षणापासून वंचित करणं ही समाजाची कुरुपता नाहीतर काय म्हणता येईल? एकीकडे शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत आणि मुलगी म्हणजे ओझं. चुकीचं पाऊल पडलं तर  लग्न उरकून घ्यायचं. भले नवीन परिस्थितीला ती मुलगी तोंड देऊ शकली नाही,  तरी पर्वा नसते.
मुलाच्या लैंगिक, भावनिक, विवाहविषयक विचारांना समजून घेणारी समंजस पालकफळी केव्हा निर्माण होणार? अज्ञानातून  समस्या उद्भवतात. जन्मापासून प्रत्येक वाढत्या टप्प्यावर मुलांच्या गरजा आहेत. पालक त्यांची पूर्तताही करतात. शक्य नसल्यास समर्थन/विवेचन करतात. मग वयात आल्यावर त्यांच्या बदल्यात शारीरिक व मानसिक गरजांनाच समजून घेण्याची टाळाटाळ का होते? मुला-मुलींच्या लैंगिक गरजांना निषिद्ध का मानलं जातं? रधोंसारख्या व्यक्ती मुलांची, व्यक्तीची ही साचलेली अज्ञानाची पुटं काढण्याचं काम करत आलेली आहेत.
काही  पालक, डॉक्टर्स, समुपदेशक शिक्षक हे समाज प्रबोधनाचं  काम  पार पाडू शकतात. स्वत:च्या व्यस्त कार्यातून वेळ काढून सर्वानी एकत्र येऊन अशा कार्याची फळी उभी करणं गरजेचं आहे. खर तर कधी नव्हे इतकी जात, धर्म, लिंग यांची स्तोमं वाढत चालली आहेत. ही म्हणजे समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक :हासाची लक्षणं आहेत. अज्ञान, अन्याय दूर करून समाज सशक्त करण्यासाठी काळाच्या प्रत्येक टप्प्यावर र.धों.सारख्या धुरिणांची सदैव गरज राहणारच आहे. या नाटकामुळे ‘‘समाजभान जागे व्हावे’’ हीच तर खरी गरज आहे.
अतुल पेठे यांनी दिग्दर्शनातून नाटकाचा विषय उत्कट आणि प्रभावी मांडला. त्यांची छोटीशी व्यक्तिरेखा ही लक्षवेधक झालेली आहे. लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी हे प्रभावी माध्यम आहे, याचा अनुभव येतो. गिरीश कुलकर्णी नाटकभर र.धों.चं अस्तित्व सतत टिकवून ठेवतात. जळगावच्या उन्हाळ्यात थिएटरच्या गैरसोयीतही घामाने ड्रेनआऊट होत नाटकाचा प्रयोग पूर्ण केला, या मागे अतुल पेठेंची तळमळ दिसून आली. नाटकाची तिकिटे विकली न गेल्यामुळे नुकसान सोसूनही शंभू पाटील यांनी नाटक आणलं. लेखाच्या अखेरीस राष्ट्रसंत तुकारामांचा अभंग दिल्यावाचून राहावत नाही. ते म्हणतात-
पंचागांच्या मागे लागतो आडाणी
पाहे क्षणोक्षणी शुभाशुभ
मूर्ख भट म्हणें त्याज्य दिन आज
दक्षिणेची लाज बाळगेना
कामचुकारांना धाजिर्णे पंचांग
सडलेले अंग संस्कृतीचे ।।
चांगल्या कामाला लागावे कधीही
गोड फळ येई कष्ट घेता
दुष्टकामे केली शुभ वेळेवरी
माफी नाही तरी शिक्षेतूनी
वेळ हवा पाणी आकाश बाधेना
भटांच्या कल्पना शुभाशुभ
विवेकाने वागा निर्भय होऊन
अशुभाचे भय निर्बुद्धांना
सत्य सांगा लोकां जरी कडू लागे
चाला, नाही मागे, आला कोणी।।
 
 

Web Title: 'Sastha Swasthya' is a playwright

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.