उपचारानंतर घरी परतणाऱ्या रुग्णांच्या चेहºयावरील समाधान मोलाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 11:28 PM2020-10-05T23:28:39+5:302020-10-05T23:30:20+5:30

बाधितांची संख्या कमी होत असल्याने दाखल रुग्ण कमी असून, बहुतेक बाधित गृहविलगीकरणात असून घरीच उपचार घेत आहेत.

Satisfaction on the face of patients returning home after treatment is invaluable | उपचारानंतर घरी परतणाऱ्या रुग्णांच्या चेहºयावरील समाधान मोलाचे

उपचारानंतर घरी परतणाऱ्या रुग्णांच्या चेहºयावरील समाधान मोलाचे

Next
ठळक मुद्देजामनेर कोविड सेंटरमधील डॉक्टर, परिचारिकांची भावनाबहुतेक बाधित गृहविलगीकरणात असून घरीच

मोहन सारस्वत/लियाकत सय्यद
जामनेर : पळासखेडे बुद्रूक, ता.जामनेर येथील कोविड सेंटरमध्ये सध्या ३६ बाधितांवर उपचार सुरू असून महिला डॉक्टर, फार्मासिस्ट, परिचारिका व वार्डबॉय कार्यरत आहे. बाधितांची संख्या कमी होत असल्याने दाखल रुग्ण कमी असून, बहुतेक बाधित गृहविलगीकरणात असून घरीच उपचार घेत आहेत.
डॉ.अनिता राठोड रविवारी सकाळ शिफ्टमध्ये होत्या. त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, एप्रिलपासून कोविड सेंटरमध्ये सेवा देत आहे. सहा तासांची ड्युटी असते. सुरुवातीला काही दिवस काम करताना भीती वाटायची. आता सवय झाली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क लावणे गरजेचे आहे याची जाणीव रुग्णांना असल्याने ते औषधी घेण्यासाठी अथवा भेटण्यासाठी आले तरी अंतर ठेवूनच वागतात.
बाधितांच्या सानिध्यात राहत असल्याने कुटुंबातील व्यक्तींना आपल्यापासून त्रास होऊ नये यांची काळजी घेतो. काही रुग्णाची वागणूक चांगली नसली तरी त्यांना समजून घ्यावे लागते. मात्र वयोवृद्ध आमच्या सेवेला समजून घेतात. उपचारानंतर बरे होऊन घरी परतणारे रुग्ण जाताना आभार मानतात व आम्ही केलेल्या उपचारांबाबत दोन शब्द चांगले बोलतात. त्यांच्या चेहºयावरील समाधान आमच्या रुग्णसेवेला बळ देणारे ठरते, असे डॉ.राठोड यांनी सांगितले.
परिचारिका मोनाली साबळे यांनी सांगितले की, रुग्णांना औषधी पुरविणे, वेळोवेळी त्यांची विचारपूस करणे आदी कामे करताना चांगले वाईट अनुभव येतातच. रुग्ण हा शेवटी रुग्णच आहे, त्यांच्याय चिडचिडीकडे दुर्लक्ष करावे लागते. सेवाभाव वृत्तीने वागून रुग्णसेवा दिल्याशिवाय उपचार होत नाही याची जाणीव आम्हाला आहे. डॉ.राठोड व फार्मासिस्ट सुनीता दवंगे यांचे सहकार्य मिळत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे दररोज तपासणीसाठी येतात, असेही डॉ.राठोड यांनी सांगितले.

Web Title: Satisfaction on the face of patients returning home after treatment is invaluable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.