शिक्षणासाठी मोबाइल मिळताच विद्यार्थांच्या चेहऱ्यावर दिसले समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:09+5:302021-09-21T04:18:09+5:30

कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेले असतांना आता ते हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली आहे.परंतु शाळा अद्याप सुरू झालेल्या ...

Satisfaction was seen on the faces of the students as soon as they got mobiles for education | शिक्षणासाठी मोबाइल मिळताच विद्यार्थांच्या चेहऱ्यावर दिसले समाधान

शिक्षणासाठी मोबाइल मिळताच विद्यार्थांच्या चेहऱ्यावर दिसले समाधान

Next

कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेले असतांना आता ते हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली आहे.परंतु शाळा अद्याप सुरू झालेल्या नसल्याने शिक्षक ऑनलाइन अभ्यासक्रम घेत असल्याने काही गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नसल्याने शिनकर यांनी विद्यार्थाना मोबाइलचे वाटप केले. विद्यार्थ्यांना मोबाइल मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य तर दिसलेच पण आपणही आता ऑनलाइन शिक्षण घेऊ शकू, असे समाधान दिसून आले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, शालेय पोषण आहार योजनेचे अधिक्षक चंद्रकांत चौधरी, जि.प. शाळा कामतवाडी शिक्षक लोढे, विजय बाबुलाल नावरकर,रवींद्र पाटील, शिक्षक शिक्षिका वृंद उपस्थित होते. त्याच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशाच प्रकारे इतर ठिकाणी असा स्तुत्य उपक्रम राबविण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

छाया--कामतवाडी ता. पारोळा येथील विद्यार्थ्यांना मोबाइल सेट वाटप करताना उपस्थित मान्यवर.

२१/६

Web Title: Satisfaction was seen on the faces of the students as soon as they got mobiles for education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.