मृत्यूदराचा आलेख वाढताच़़ बरे होणाऱ्यांचे प्रमाण समाधानकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:35 AM2020-06-13T11:35:02+5:302020-06-13T11:35:20+5:30
मे ते जून महिन्यातील स्थिती : ४३ टक्के रुग्ण झाले आहेत बरे
आनंद सुरवाडे ।
जळगाव: जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस अगदीच झपाट्याने वाढत आहे़ गेल्या दोन दिवसातच २३० रुग्ण आढळून आले आहे़ मंगळवारी एकाच दिवसात आजपर्यतचे सर्वाधिक ११६ रुग्ण आढळून आले होते़ अशातच मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही कमी होत नसल्याचे चित्र आहे़ मृत्यूचा आलेख वाढत असतानाच बरे होणाºयांचे प्रमाणही समाधानकारक असल्याचे चित्र आहे़
जिल्हाभरात १० जूनपर्यंत १३९६ रुग्ण होते़ त्यात ६०१ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आलेले आहेत़ तर १२० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे़ ६७५ रुग्णांवर सद्यस्थितीत उपचार सुरू आहेत़ यात सर्वाधिक रुग्ण हे जळगाव तालुक्यातील आहेत. शहर व तालुका मिळून एकूण ३०६ रुग्ण झालेले आहेत़
मृत्यूदर 8.5%
जळगावात मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ मात्र, दुसरीकडे रुग्णसंख्याच झपाटयाने वाढत असल्याने काही दिवसांपूर्वी १२ टक् क्यांवर असलेला मृत्यूदर सध्या ८ ते साडे आठ टक्यांवर आलेला आहे़
दुसरीकडे बरे होणाºयांचे प्रमाण हे ४३़ ५ टक्के आहेत़ दररोज बरे होणाºयांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे़ मात्र, सद्यस्थितीत बरे होणाºयांपेक्षा उपचार घेत असलेल्यांची संख्या अधिक असल्याने चिंता कायम आहे़
जूनमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक : मे मध्ये महिनाभरात ७१० रुग्ण आढळून आले होते़ मात्र, जूनमध्ये पहिल्या १० दिवसांमध्येच ६६४ रुग्ण आढळून आले आहेत़ यात गेल्या दोन दिवसातच २३० रुग्ण आढळून आलेले आहेत़ रुग्णवाढीचा हा वेग अत्यंत झपाट्याने वाढत आहे़ त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ रुग्णांबरोबर क्वारंटाईन करण्यात येणाºयांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवर प्रचंड ताण असल्याचे चित्र आहे़
रुग्ण दुप्पटीचे प्रमाण दहा दिवसांवरच : रुग्ण झपाट्याने वाढत असून जिल्ह्यात दहा दिवसांनी रूग्ण दुप्पट होत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे़ ६ मे रोजी असलेले ८५ रुग्णांचे दुप्पट होण्यासाठी चार दिवस लागले होते़
नंतर हे दुपटीचे प्रमाण दहा दिवसांवर गेल़े दरम्यान, २७ मे रोजी असलेले ५२३ रुग्णांचे दुप्पट दहा दिवसांनी म्हणजे ७ जून रोजी झालेली होती़