भडगाव व वडगावात चंद्रकातदादा मोरे यांचे सत्संग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 04:46 PM2018-12-14T16:46:53+5:302018-12-14T16:51:19+5:30

दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख चंद्रकांत दादा मोरे यांचे भडगांव येथे श्री स्वामी समर्थ अध्यामिक व बालसंस्कार केंद्र व पाचोरा तालुक्यातील वडगाव येथे भव्य सत्संग मेळावा झाला.

Satsanga of Chandrakandada More in Bhadgaon and Wadgaon | भडगाव व वडगावात चंद्रकातदादा मोरे यांचे सत्संग

भडगाव व वडगावात चंद्रकातदादा मोरे यांचे सत्संग

Next
ठळक मुद्देश्री.स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे आयोजनभाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमुलांना संस्कारित करण्याचे केले आवाहन

भडगाव : दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख चंद्रकांत दादा मोरे यांचे भडगांव येथे श्री स्वामी समर्थ अध्यामिक व बालसंस्कार केंद्र व पाचोरा तालुक्यातील वडगाव येथे भव्य सत्संग मेळावा झाला.
भडगाव येथील कार्यक्रमास प्रमुख पाहणे म्हणुन आमदार किशोर पाटील, भडगांव नगराध्यक्ष राजेंद्र पाटील , नगरसेवक सुनिल देशमुख , नगरसेवक सचिन चिरोडीया यांची उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनात चंद्रकांत दादा मोरे यांनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची कार्यप्रणाली समस्त सेवेकरी वर्गाला समजावून सांगताना मार्गातील कार्यरत विविध सोळा विभागाची माहिती दिली. ८० टक्के समाजकारण व २० टक्के अध्यात्माचा उपयोग करून मानवी जीवनातील विविध प्रापंचीक अडचणी सेवेच्या माध्यमातुन सोडवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हा प्रतिनिधी निकम यांनी तर सुत्र संचालन अतुल परदेशी यांनी केले. यावेळी प्रदीप महाजन, मनिष बाविस्कर, शरद पाटील भातखंडे यांची उपस्थिती होती.
वडगावला सत्संग मेळावा उत्साहात
सातगाव डोंगरी, ता.पाचोरा : वडगाव कडे ता. पाचोरा येथे भव्य सत्संग मेळावा घेण्यात आला. गुरुमाऊली चंद्रकांत दादा मोरे यांनी मार्गदर्शन करताना ‘मुलांना संस्कारित करा’ असे आवाहन केले. जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी प्रास्ताविक केले. मुलांनी शाळेत जाण्यापूर्वी आई-वडिलांचे दर्शन घ्यावे. दर्शन घेतांना पायावर डोके ठेवून दर्शन घ्यावे. जो आई-वडिलांपुढे झुकतो, त्याला आयुष्यात कधीच लोकांपुढे झुकण्याची वेळे येत नाही. स्त्रियांनी गर्भसंस्कार व संस्कारासाठी स्वामी समर्थ केंद्रात येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चितानंदजी महाराज घोसला, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार बी.ए.कापसे, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, उपसभापती अनिता पवार, जि.प. सदस्य मधुकर काटे, माजी सभापती सुभाष पाटील, मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान पाटील, कृ.उ.बाजार समिती सदस्य नरेंद्र पाटील, जयराम बाबा, शिक्षणाधिकारी बी.जी. पाटील, माजी सभापती चंद्रकांत पाटील, रामदास घुले, सरपंच अतुल पाटील, शंकर पाटील, सुगंधी पाटील, भगवान पाटील, ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा.शिवाजी शिंदे यांनी केले.

Web Title: Satsanga of Chandrakandada More in Bhadgaon and Wadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव