सव्वालाखाचा गांजा चोपडा येथे पकडला
By Admin | Published: January 15, 2017 12:59 AM2017-01-15T00:59:56+5:302017-01-15T00:59:56+5:30
गांजाची तस्करी करणा:या रवी पाडवी व मनोज डावर या दोघांना शुक्रवारी चोपडा शहरातील विरवाडे फाटय़ाजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सव्वालाख रुपये किमतीचा 15.5 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
चोपडा/जळगाव : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणा:या रवी कालुसिंग पाडवी (वय 19, रा.लाकडय़ा हनुमान, ता.शिरपूर, जि.धुळे) व मनोज लश्या डावर (वय 19 रा.हिदपा बलवाडी, ता.वरला, जि.बजवाणी मध्य प्रदेश) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी चोपडा शहरातील विरवाडे फाटय़ाजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सव्वालाख रुपये किमतीचा 15.5 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातून आणलेल्या गांजाची विरवाडे, वैजापूर व चोपडा मार्गे तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना मिळाली होती. त्यानुसार चंदेल यांनी सहायक निरीक्षक प्रकाश वानखेडे यांचे एक पथक रवाना केले होते तर चोपडा शहरचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी त्यांचे पथक मदतीला दिले होते. या दोन्ही पथकाने यावल रस्त्यावर सापळा लावला असता रात्री एका विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन आलेल्या रवी पाडवी व मनोज डावर या दोघांना अडविले असता त्यांच्याजवळ गांजा आढळून आला. दोघांकडून गांजा व दुचाकी जप्त करण्यात आली. दरम्यान, दोघा आरोपींना चोपडा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास सपोनि रामकृष्ण पवारे करीत आहेत. (वार्ताहर)