लेह-लडाख येथे अपघातग्रस्तांना वाचविणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील डॉक्टरांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:47 AM2018-07-18T11:47:01+5:302018-07-18T11:50:05+5:30

‘रेडक्रॉसतर्फे’ जीवनदाता सन्मान

saved the victims of the accident | लेह-लडाख येथे अपघातग्रस्तांना वाचविणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील डॉक्टरांचा सत्कार

लेह-लडाख येथे अपघातग्रस्तांना वाचविणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील डॉक्टरांचा सत्कार

Next
ठळक मुद्देडॉक्टरांनी सांगितला थरारक प्रसंगचारशे मीटर खोल दरीत पडलेली होती कार

जळगाव : लेह-लडाख येथे अपघातग्रस्तांना वेळीच मदत करीत त्यांना जीवदान देणा-या जळगाव जिल्ह्यातील डॉक्टरांचा रेडक्रॉस सोसायटीतर्फे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते जीवनदाता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्या ६५व्या वर्धापन दिनानिमित्त जैन हिल्स येथील गांधी रिसर्च फाउंडेशन येथील कस्तुरबा हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात या डॉक्टरांना सन्मानीत करण्यात आले.
डॉ. विरेंद्र झांबरे, डॉ. नितीन खडसे, डॉ.धीरज चौधरी, डॉ.दीपक पाटील, डॉ. नीलेश चौधरी व सी.ए. कपिल पाटील हे लेह लडाख येथे गेलेले असताना तांगलाला पास या समुद्र सपाटीपासून सोळा हजार पाचशे फूट उंचावर असलेल्या ठिकाणी एक अपघात होऊन एक कार चारशे मीटर खोल दरीत पडलेली होती. त्या वेळी वरील सर्वजणांनी दरीत उतरून मदत केली व जखमींना मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलविले होते. त्यामुळे जखमींना जीवदान मिळाले.
त्याबद्दल बुधवारी झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, या डॉक्टरांनी अतिदुर्गम भागात व अनोळखी प्रदेशात जीवन दानाचे कार्य केले. अपघातग्रस्तांना मदत करून सर्वांनी समाजासमोर एक चांगला संदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. धीरज चौधरी यांनी घडलेला सर्व प्रसंग या वेळी सांगितला. या प्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनीही मनोगत व्यक्त केले.
रेडक्रॉसचे मानद सचिव विनोद बियाणी, कोषाध्यक्ष सतीश चरखा, सहसचिव राजेश यावलकर, सहकोषाध्यक्ष जी.टी. महाजन, कार्यकारिणी सदस्य शेखर सोनाळ्कर, डॉ. विजय चौधरी, अनिल कांकरीया व पुष्पाताई भंडारी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: saved the victims of the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.