बचत गटाच्या महिलांची बँकांकडून उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:51 PM2019-09-23T23:51:23+5:302019-09-23T23:51:28+5:30

उमेद योजना : खाते उघडण्यास टाळाटाळ

Savings group women neglect banks | बचत गटाच्या महिलांची बँकांकडून उपेक्षा

बचत गटाच्या महिलांची बँकांकडून उपेक्षा

googlenewsNext





अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राबवण्यात येणा?्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद योजनेत बँकांच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे महिलांना नाउमेद व्हावे लागत आहे.
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील महिलांसाठी उमेद योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागातील बचत गटाचे बँकेत खाते उघडून ३ महिन्यानंतर खेळते भांडवल म्हणून १० ते १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी बँकेत बचत खाते उघडणे आवश्यक आहे. तालुक्यातील विविध बँका अडचणी निर्माण करून खाते उघडण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी होत आहेत.

Web Title: Savings group women neglect banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.