समझोत्याने तंटे मिटविल्यास वेळ व पैशांची होणार बचत : न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 11:10 PM2018-10-07T23:10:42+5:302018-10-07T23:13:14+5:30

क्षकारांना सुविधा व्हावी व न्यायव्यवस्थेचे काम सुरळीतपणे पार पडावे यासाठी न्यायालयाची नुतन वास्तू ही न्यायाधिश व वकीलांना उर्जा देईल व न्यायव्यवस्थेचे काम अधिक गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय वि.गंगापुरवाला यांनी केले.

Savings over time and money will be settled if the settlement is settled: Justice Sanjay Gangapur | समझोत्याने तंटे मिटविल्यास वेळ व पैशांची होणार बचत : न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला

समझोत्याने तंटे मिटविल्यास वेळ व पैशांची होणार बचत : न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला

googlenewsNext
ठळक मुद्देधरणगाव न्यायालयाच्या इमारतीचा शुभारंभनवीन इमारतीमुळे कामकाज होणार गतीमान

धरणगाव : पक्षकारांना सुविधा व्हावी व न्यायव्यवस्थेचे काम सुरळीतपणे पार पडावे यासाठी न्यायालयाची नुतन वास्तू ही न्यायाधिश व वकीलांना उर्जा देईल व न्यायव्यवस्थेचे काम अधिक गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय वि.गंगापुरवाला यांनी केले.
यावेळी न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधिश गोविंदा आ.सानप हे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण झाले. वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. बापूराव आवारे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर धरणगाव न्यायालयाचे न्या.सचिन भावसार, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.बापूराव आवारे, कार्यकारी अभियंता प्रमोद मोराणकर, उपअभियंता सुनील जोशी उपस्थित होते. न्या.संगीतराव पाटील यांनी न्यायालयात खटले चालविण्यापेक्षा समझोत्यांने तंटे मिटविण्यासाठी वकीलांनी प्रयत्न केल्यास समाजाचा वेळ, पैशाची बचत होईल असे सांगितले.
यावेळी न्या.सचिन भावसार, धरणगाव वकील संघातर्फे सचिव अ‍ॅड.शरद माळी,उपाध्यक्ष संदीप सुतारे, माजी अध्यक्ष अ‍ॅड.संजय शुक्ला, अ‍ॅड.सी.झेड.कट्यारे, अ‍ॅड.महाजन, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष आर.आर.महाजन, अ‍ॅड.पी. बी.पाटील, आर.एन.ठाकूर, डी.एस. वाघ, अ‍ॅड. महेंद्र चौधरी, अ‍ॅड.दिलीप रावतोळे, अ‍ॅड.जगदीश पाटील, अ‍ॅड. संदीप पाटील, अ‍ॅड.राहुल पारेख, अ‍ॅड. गजानन पाटील, अ‍ॅड.दिलीप बोरसे यांच्यासह वकील बांधवांनी परिश्रम घेतले.

Web Title: Savings over time and money will be settled if the settlement is settled: Justice Sanjay Gangapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.