थोरगव्हाण जि.प.शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 13:47 IST2021-01-03T13:46:41+5:302021-01-03T13:47:00+5:30
थोरगव्हाण येथील जि.प.शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने महिला शिक्षण दिन उत्साहात साजरी करण्यात आला.

थोरगव्हाण जि.प.शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी
मनवेल, ता.यावल : येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण येथील जि.प.शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने महिला शिक्षण दिन उत्साहात साजरी करण्यात आला. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक हजर होते. प्रतिमा पूजन पोलीस पाटील गजानन नारायन चौधरी यांनी केले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम झुरकाळे, उपाध्यक्ष निवृत्ती अरुण चौधरी, सदस्य सुरेश रामदास चौधरी, विनोद केशरसिंग भालेराव, विनोद श्रावण पाटील व ग्रामस्थ मंडळी तसेच मुख्याध्यापक महेंद्र हिरामन देवरे, शिक्षक एकनाथ माधव सावकारे व नीलेश धर्मराज पाटील उपस्थित होते.