पाचोरा येथील गो.से.हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 02:22 PM2021-01-03T14:22:36+5:302021-01-03T14:22:52+5:30

पाचोरा येथील गो.से.हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Savitribai Phule Jayanti celebrations at GS High School, Pachora | पाचोरा येथील गो.से.हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात 

पाचोरा येथील गो.से.हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात 

Next

पाचोरा : येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से. हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संस्थेचे  चेअरमन संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शालेय समितीचे चेअरमन  खलील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा महिला शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षिका  सुखदा पाटील यांना सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका पी.एम.वाघ यांनी केले. संस्थेचे चेअरमन संजय वाघ तसेच पर्यवेक्षक अजय अहिरे यांनी मनोगतातून सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या उदात्त कार्याचा आढावा घेतला.
यावेळी श्वेता आवारे, भूमी पाटील, श्रावणी सोमवंशी, श्रुती शिंपी,शितल बोरुडे, जान्हवी पाटील, आकांक्षा कुहरे, सक्षम कौंडिण्य या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून खलील देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. व्यासपीठावर  तांत्रिक  विभागाचे  चेअरमन  वासुदेव महाजन, मुख्याध्यापक  सुधीर पाटील, पर्यवेक्षक आर.एल.पाटील, एन.आर.पाटील,  तांत्रिक विभागप्रमुख  एस.एन.पाटील, किमान कौशल्य विभागप्रमुख मनीष बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. ईशस्तवन सागर थोरात आणि रुपेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी, तर आभार सी.एल.जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Savitribai Phule Jayanti celebrations at GS High School, Pachora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.