सावित्रीबाई फुले जयंती बातमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:13 AM2021-01-04T04:13:28+5:302021-01-04T04:13:28+5:30

येथील बालनिकेतन विद्यामंदिर व नवीन माध्यामिक विद्यालयात शिक्षिका छाया पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ...

Savitribai Phule Jayanti News Add | सावित्रीबाई फुले जयंती बातमी जोड

सावित्रीबाई फुले जयंती बातमी जोड

Next

येथील बालनिकेतन विद्यामंदिर व नवीन माध्यामिक विद्यालयात शिक्षिका छाया पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी यांच्यासह शिक्षक नरेंद्र वारके, नीलेश नाईक, राजेेंद्र पवार, श्रीकांत पाटील, राहुल धनगर, उज्ज्वला जाधव, वंदना नेहते, रशिदा तडवी, सुवर्णा सोनार, संगीता निकम, ज्योती सपकाळे उपस्थित होते.

रावसाहेब रूपचंद विद्यालय

रावसाहेब रूपचंद विद्यालयात उपमुख्याध्यापक डी.टी. पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर निबंध स्पर्धाही घेण्यात आल्या. यावेळी शिक्षक डी.बी. पांढरे, के.पी. माळी, एस.एन. चौधरी, व्ही.एम. ढाके, वाय.एच. बडगुजर. एस. आर. वाणी आदी शिक्षक उपस्थित होते.

भगीरथ विद्यालय

येथील भगीरथ विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच यावेळी शिष्यवृत्तीला बसलेल्या विद्यार्थांसाठी कलाशिक्षक एस. डी. भिरूड यांच्या हस्ते मोफत वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किशोर राजे, उपमुख्याध्यापक सीमा वैजापूरकर, पर्यवेक्षिका प्रिया सफळे आदी शिक्षक उपस्थित होते.

मानवसेवा विद्यालय

येथील मानवसेवा विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर वेदांत पाटील या विद्यार्थाने ऑनलाइन पद्धतीने सावित्रीबाई यांची वेशभूषा सादर करून सावित्रीबाई यांच्या कार्याची माहिती दिली. यावे‌ळी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, शिशूच्या मुख्याध्यापका मुक्ता पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.

चांदसरकर विद्यालय

खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित कै. गि.न. चांदसरकर प्राथमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून, ऑनलाइन निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्याम ठाकरे, जयश्री पाटील, स्वप्निल भोकरे, महेश तायडे, भूषण अमृतकर उपस्थित होते.

Web Title: Savitribai Phule Jayanti News Add

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.