आदिवासी प्रकल्प कार्यालयात सव्वाकोटीचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:54 PM2019-03-18T12:54:55+5:302019-03-18T13:12:25+5:30
पाच प्रकल्प अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
यावल, जि. जळगाव : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील आदिवासींसाठी असलेल्या विविध योजनेअंतर्गत सन २००५ ते २०१० या कालावधीत तत्कालीन पाच प्रकल्प अधिकारी व अन्य एकाने तसेच कर्मचाऱ्यांनी १ कोटी वीस लाख ४ हजार ८८५ रुपयांचा अपहार केला असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून अकोला येथे बदलून गेलेले आर. बी. हिवाळे यांनी यांनी दिलेल्या फियार्दीवरून येथील पोलिस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेने प्रचंड खळबळ माजली आहे
येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत दुधाळ जनावरे वाटप करणे, आदिवासी विवाहित जोडप्यांना मंगळसूत्राचे वाटप करणे व संसार उपयोगी भांड्यांचे वाटप करणे या योजनेअंतर्गत हा अपहार झालेला आहे यात २००५ ते २००८ मध्ये तत्कालीन प्रकल्प अधिकारी तारासिंग पाडवी यांनी दीपक लॅब नांदगाव यांना २० मंगळसूत्र व भांडी याची आॅर्डर दिली होती त्यात दोन लाखाचा अपहार झालेला आहे. तर २००५ ते २००६ या कालावधीत तत्कालीन प्रकल्प अधिकारी एन. एम. निकुंभे यांनी २५७ मंगळसूत्र व भांडी संच यामध्ये पंचवीस लाख रुपयाचा अपहार केला. त्यानंतर सन २००८ ते २०१० या कालावधीत तत्कालीन प्रकल्प अधिकारी जी. एन. वळवी यांनी दुधाळ जनावरे वाटप योजनेत सागर सुधाकर धामणे यांच्या पंकज मच्छीमार सोसायटी अमळनेर आशापुरी माता शेळी मेंढीपालन अमळनेर या एजन्सीच्या नावे ६१ लाख ६८हजार २४० रुपयाचा अपहार केला. २००६ ते २००७ या काळात तत्कालीन प्रकल्प अधिकारी टी. बी. पाडवी, एस. इ. उमाळे ए. एम. थोरात यांनी तीस मंगळसूत्र व भांडी संच यात ३ लाख रुपयांचा अपहार केला आहे. सन २००८ ते २०१० या कालावधीत तत्कालीन प्रकल्प अधिकारी जी. एन. वळवी यांनी एचडी पीव्हीसी पाणीपुरवठा योजनेत १ हजार ७३९ पाईप पुरवठा करण्यासाठी ३ लाख ३२ हजार ६०५ रुपयाचा अपहार केला आह. २००७ ते २००८ या कालावधीत तत्कालीन प्रकल्प अधिकारी एन. एम. निकुंभ यांनी दुधाळ जनावरे वाटप योजनेत ८३ शेळी गटांना वाटप केल्याचे दर्शवून २५ लाख रुपयाचा अपहार केल्याची फियार्दीत म्हटले आहे. याप्रकरणी ५ प्रकल्प अधिकारी व तत्कालीन कर्मचारी व अन्य एजन्सी यांचेवर १ कोटी २० लाख ४ हजार ८४ ५ रुपयाच्या रकमेचा अपहाराचा ठपका ठेवलेला आहे .