एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशाबाबत चाचपणी करण्यासाठीच सावंत यांचा जळगाव दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 01:04 PM2019-12-17T13:04:56+5:302019-12-17T13:05:48+5:30

पदाधिकाऱ्यांचे जाणून घेतले वैयक्तिक मत

Sawant's visit to Jalgaon to test the entry of Eknathrao Khadse | एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशाबाबत चाचपणी करण्यासाठीच सावंत यांचा जळगाव दौरा

एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशाबाबत चाचपणी करण्यासाठीच सावंत यांचा जळगाव दौरा

googlenewsNext

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांना ऊत आला आहे. खडसे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चाही जोरात असून, या पार्श्वभूमीवर सेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी शनिवार व रविवार दोन दिवस तातडीने शहराच्या दौºयावर येवून सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पदाधिकाºयांकडून जाणून घेतलेल्या माहितीचा संपूर्ण आढावा सावंत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे काही दिवसांपासून पक्षाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत जाहीरपणे भूमिका मांडत आहेत. त्यामुळे खडसे भाजपा सोडून शिवसेनेत जाणार असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. खडसे भाजप सोडून शिवसेनेत आले तर जिल्ह्यातील सेनेच्या पदाधिकाºयांची नेमकी भूमिका काय राहील?, खडसेंच्या प्रवेशामुळे सेनेला जिल्ह्यात व खान्देशात काय फायदा होईल ? याबाबतची चाचपणी करण्यासाठी संजय सावंत यांनी तातडीने जळगाव दौरा काढत दोन दिवस सेनेचे पदाधिकारी, जि.प.सदस्य, नगरसेवकांशी चर्चा करून खडसेंच्या प्रवेशाबाबत पदाधिकाºयांची मतं जाणून घेतली. पदाधिकाºयांकडून घेतलेल्या माहितीचा आढावा सावंत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे देणार आहेत. त्यानंतर ठाकरे आपला निर्णय घेणार असल्याची माहितीही सेनेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
आमदार भोळेंशीही केली चर्चा
रविवारी जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी पद्मालय विश्रामगृहात जावून संजय सावंत यांची भेट घेतली. याबाबत आमदार भोळे यांना विचारले असता, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळे त्यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.
बंदव्दार केली वैयक्तिक चर्चा
संजय सावंत यांनी शनिवारी व रविवारी पुर्ण दिवसभर अजिंठा व पद्मालय शासकीय विश्रामगृहात जिल्हाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवकांशी वैयक्तिक पातळीवर चर्चा केली. यामध्ये अनेक पदाधिकाºयांनी खडसेंच्या शिवसेनेत येण्याबाबत सकारात्मकता व्यक्त केली. तर काही ठिकाणच्या पदाधिकाºयांनी खडसे यांना पक्षात घेवू नये असेही सांगितले. सावंत अजून माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शिवसेना आमदारांशी देखील याबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतरचा संपुर्ण अहवाल तयार केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पं.स.ची सभापतींपदे महाविकास आघाडीकडे खेचण्याचा प्रयत्न
जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांवर महाविकास आघाडीचा सभापती कसा होईल याबाबत देखील सावंत यांनी पदाधिकाºयांशी चर्चा केली. ज्या तालुक्यात शिवसेनेचा जोर किंवा सदस्य कमी असतील अशा ठिकाणी कॉँग्रेस व राष्टÑवादीचा सभापती करण्यावर भर द्यावा तर ज्या ठिकाणी शिवसेनेचा जोर आहे. अशा ठिकाणी गरज पडल्यास राष्टÑवादी व कॉँग्रेसचा पाठींबा घेवून पंचायत समित्या काबीज करण्याबाबतच्या सूचना त्यांनी सेना पदाधिकाºयांना दिल्या.
खडसेंंच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांनाही उत
एकीकडे शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी खडसे हे शिवसेनेत येण्याच्या चर्चांवरून तातडीने जिल्हा दौरा केला असताना, दुसरीकडे एकनाथराव खडसे हे राष्टÑवादीत २० रोजी प्रवेश घेणार असल्याचीही चर्चा रंगत आहे. त्यामुळे आता विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतरच खडसे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Web Title: Sawant's visit to Jalgaon to test the entry of Eknathrao Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव