तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहे म्हणत सव्वातीन लाखांचा गंडा; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला फसवले 

By विजय.सैतवाल | Published: September 10, 2023 04:42 PM2023-09-10T16:42:54+5:302023-09-10T16:44:05+5:30

मुंबई येथून तुमच्या नावाने तैवान येथे पार्सल गेले, मात्र त्यात ड्रग्स असल्याने ते परत आले आहे.

Saying that your parcel contains drugs, a sum of Rs. A software engineer cheated a young woman | तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहे म्हणत सव्वातीन लाखांचा गंडा; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला फसवले 

तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहे म्हणत सव्वातीन लाखांचा गंडा; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला फसवले 

googlenewsNext

जळगाव : मुंबई येथून तुमच्या नावाने तैवान येथे पार्सल गेले, मात्र त्यात ड्रग्स असल्याने ते परत आले आहे. त्यासाठी सायबर क्राईमशी बोलणे करून देतो, असे भासवत बँकेची सर्व माहिती घेऊन सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या ऋतुजा विजयानंद पवार (३२, रा. द्रौपदीनगर, जळगाव) यांची तीन लाख २६ हजार ८७ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे येथील एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करीत असलेल्या ऋतुजा पवार यांना ८ सप्टेंबर रोजी एका कुरीयर कंपनीमधून अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने पवार यांना तुमच्या नावाने अंधेरी, मुंबई येथून तैवान येथे एक पार्सल गेले आहे. त्यामध्ये तुमचे कपडे, क्रेडीट कार्ड, पासपोर्ट व ड्रग्स आहे. ड्रग्स असल्यामुळे ते पार्सल परत आमच्या ऑफिसमध्ये आले आहे. त्यावर तरुणीने आपण असे कोणतेही पार्सल पाठविले नसल्याचे सांगितले. त्यावर त्या व्यक्तीने मी तुमचा फोन कॉल सायबर क्राईमला फॉरवर्ड करतो, असे सांगितले. समोरील व्यक्तीने आपण सायबर क्राईममधून संजयकुमार बोलत असल्याचे सांगितले. त्याने तुम्ही तुमचे आधार कार्ड किंवा इतर माहिती कोणासोबत शेअर केली आहे का, तुमचा याच्यासोबत काही संबंध आहे का अशी चौकशी केली.

सायबर क्राईममधून बोलणाऱ्या व्यक्तीने पुन्हा तरुणीला कॉन्फरन्स कॉलवरुन त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बोलणे करुन दिले. त्याने तुमच्या आधारकार्डचा गैरवापर झाल्याचा सांगून त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर काही वेळातच तरुणीच्या बँक खात्यातून ३ लाख २६ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करुन घेत तरुणीची फसवणूक केली. तरुणीला पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आल्यानंतर तरुणीने बँक खात्याबद्दल माहिती जाणून घेतल्यानंतर हे पैसे गुजरात येथे ट्रान्सफर झाल्याचे समजले. त्यानंतर तरुणीने जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुवर्णा तायडे करीत आहेत.

Web Title: Saying that your parcel contains drugs, a sum of Rs. A software engineer cheated a young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव