डीआयजींसह एसपींना खंडपीठाची नोटीस

By admin | Published: April 7, 2017 03:48 PM2017-04-07T15:48:55+5:302017-04-07T15:48:55+5:30

याप्रकरणाची फाईल बंद केली़ फिर्यादी माहेती याने पंतप्रधान, राष्ट्रपतींर्पयत पाठपुरावा केला़ अखेर न्याय मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली़

SC issues notice to SC | डीआयजींसह एसपींना खंडपीठाची नोटीस

डीआयजींसह एसपींना खंडपीठाची नोटीस

Next

जळगाव : तोतया आयकर अधिकारी असल्याचे सांगून बंगाली दागिन्यांचे कारागीर गुरुदेव रामपद माहेती यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत 2 किलो सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना 17 जून 2015 रोजी रिधुरवाडय़ात घडली होती़ आरोपी निष्पन्न न झाल्याचे सांगून शनिपेठ पोलिसांनी याप्रकरणाची फाईल बंद केली़ फिर्यादी माहेती याने पंतप्रधान, राष्ट्रपतींर्पयत पाठपुरावा केला़ अखेर न्याय मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली़ त्याची दखल घेत खंडपीठाने विशेष पोलीस महानिरिक्षक, पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक               तसेच पोलीस निरीक्षक या सर्व अधिका:यांना नोटीस बजावली असून या प्रकरणी दहा दिवसात खुलासा सादर करण्याचे निर्देशित केले आह़े
मारहाण करत 50 लाखांचे दागिने लुटून नेले
सोन्याचे बंगाली कारगीर गुरुदेव माहेती हे पत्नी व तीन मुलींसह रिधुरवाडय़ात रहात होत़े त्यांचे पौलवी पूनम ज्वेलर्स नावाचे दुकान होत़े 17 जून रोजी दुपारी 1 वाजता तोतया आयकर अधिकारी असल्याचे सांगत सहा ते सात जणांना चाकूचा धाक दाखवित व मारहाण करत 50 लाख रुपये किमतीचे 2 किलो 111 ग्रॅम सोन्याचे दागिने लुटून नेले होत़े याप्रकरणी गुरूदेव माहेती यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसात अज्ञात सहा जणांविरोधात भादंवि कलम 395, 397 व 342 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्यात आरोपीचा शोध लागत नसल्याचे सांगून पोलिसांनी सहा महिन्यांनंतर 31 जानेवारी 2016 रोजी गुन्ह्याची फाईल बंद केली़
शनिपेठ पोलिसांकडून माहेती यांना उडवाउडवीचे उत्तरे मिळत होती़ त्यातच स्थानिक गुन्हे शाखेकडूनही माहेती याला वाईट वागणूक मिळाली़ अखेर माहेती यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती यांना मेलव्दारे पत्र पाठविल़े अथक परिश्रमानंतर 18 फेब्रुवारी 2016 रोजी प्रत्यक्ष पंतप्रधान, राष्ट्रपती कार्यालय गाठल़े लेखी पत्राव्दारे न्याय मिळावा यासाठी साकडे घातल़े  माहेती यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दरवाजा ठोठावला़ न्यायमूर्ती के ़के ़सोनवणे व न्यायमूर्ती एस़एस़ शिंदे यांच्या व्दिस्तरीय खंडपीठासमोर या याचिकेवर कामकाज झाल़े खंडपीठाने विशेष पोलीस महानिरीक्षकांसह संबंधित अधिका:यांना नोटीस बजावली असून 13 एप्रिलर्पयत म्हणणे मांडावे असे आदेश दिले आह़े तसेच दरोडय़ाच्या गुन्ह्याचा तपास हा  सीबीआयकडे सोपविण्याबाबतही याचिकेत नमूद आह़े
मुलींच्या लग्नासाठीचे पैसे झाले खर्च
दरोडय़ाच्या गुन्ह्याचा तपास होऊन न्याय मिळावा, यासाठी एक सामान्य व्यक्ती काय करू शकतो, याचे उदाहरण गुरुदेव माहेती याच्या रूपाने समोर आले आह़े 19 वर्षापासून जळगावात वास्तव्यास असलेल्या माहेती यांना दरोडय़ाच्या घटनेने हलाखीच्या परिस्थतीमुळे कुटुंब पश्चिम बंगालमधील कुलाट या गावी हलवावे लागल़े यानंतर पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यार्पयत पोहचण्यासाठी मुलींच्या लग्नासाठीचे पैसे खर्च झाल़े स्वत:च्या अंगावरील चैन, अंगठी सुध्दा मोडावी लागली़ सर्वाचे डोळे पाणावतील अशीच माहेती यांची कहाणी आह़े पैसा नाही मिळाला चालेल़ मात्र याप्रकरणी संबंधित अधिका:यांवर कारवाई व्हावी व मला न्याय मिळावा, असे गुरुदेव माहेती यांनी लोकमतशी बोलताना सांगितल़े

Web Title: SC issues notice to SC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.